WhatsApp वर 3 लाल टिक खरंच येणार का? Viral मेसेजमधील काय आहे सत्य? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – Information Technology संबंधित एक नवा नियम अंमलात आल्यानंतर सध्या व्हाट्सअ‍ॅप (WhatsApp) वर एक मेसेज प्रसारित हातानं दिसत आहे. व्हाट्सअ‍ॅप (WhatsApp) येणाऱ्या मेसेजेसवर मोठ्या प्रमाणात निर्बंध येणार आहेत, सरकारची नजर या मेसेजेसवर राहणार आहे, सरकारची बदनामी करणारे संदेश फॉरवर्ड केले तर तातडीने कारवाईचा दंडुका बसणार आहे. अशा अनेक सूचना असलेला एक मेसेज सध्या व्हाट्सअ‍ॅप (WhatsApp) वर प्रसारित होतोय. परंतु सत्य म्हणजे हा संदेश (Message) बनवत असल्याचं समोर येत आहे.

व्हायरल संदेशमध्ये काय नमूद आहे?
> दोन निळ्या रेषा आणि एक लाल रेष अर्थात सरकार तुमच्याविरोधात कारवाई करू शकते.
> तीन लाल रेषा म्हणजे सरकारने तुमच्याविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे.
> सरकारची बदनामी करणारा मेसेज फॉरवर्ड केला तर मूळ संदेश कोणाकडून आला याची चौकशी केली जाईल. धार्मिक द्वेष पसरवणारा मेसेज प्रसारित केल्यास
तुम्हाला अटक होणार आहे.
> तुमचे सर्व कॉल्स रेकॉर्ड केले जाणार आहेत. तुमचा मोबाइल थेट केंद्रीय मंत्रालयाच्या यंत्रणेशी जोडला जाणार आहे.

अनेकवेळा फॉरवर्ड झालेला हा संदेश खरा आहे?
> नाही.. प्रसारित झालेला संदेश खोटा आहे. हा पूर्नपणे खोडसाळपणा असून असे कोणतेही निर्बंध व्हाट्सअ‍ॅप वापरकर्त्यावर लागू होणार नाहीत. व्हाट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना भीती दर्शवणारा हा संदेश मागील वर्षी देखील प्रसारित झाला होता

व्हाट्सअ‍ॅप वापरकर्त्याला कोणताही धोका नाही –
संबंधित संदेश प्रसारित झाला असला तरी त्यात काही तथ्य नाही. कारण व्हाट्सअ‍ॅप ने मेसेज देवाणघेवाणी बाबत कोणतेही नवीन नियम आणलेले नाहीत. म्हणून २ निळ्या रेषा आणि १ लाल रेष अशा मेसेजपासून वापरकर्त्यानी निश्चिंत रहावे. तसेच, १ रेष अर्थात तुमचा संदेश पाठवला गेला. २ रेषा- तो संबंधिताकडे पोहोचला. आणि २ निळ्या रेषा म्हणजे संबंधित व्यक्तीने तो संदेश वाचला. अशीच पद्धत कायम राहणार आहे. या दरम्यान, व्हाट्सअ‍ॅप , Facebook आणि Instagram तुमची फोटो, संदेश , फाइल्स आणि अन्य माहिती त्यांच्या स्वार्थासाठी वापरणार असल्याचा एक संदेश मागील वर्षी प्रसारित झाला होता. परंतु, तो बनावट असल्याचं नंतर खुलासा झाला होता.

व्हाट्सअ‍ॅप वरील Message कोणही वाचू शकते का?
> व्हाट्सअ‍ॅप वर २ व्यक्तींमधील चॅटिंग गोपनीयच राहते.
> व्हाट्सअ‍ॅप ला End-to-end encryption सुविधा आहे
> म्हणून, व्हाट्सअ‍ॅप वर तुम्ही दुसऱ्या कोणाला पाठवलेला Messages, photos, voice messages, documents, status updates फक्त व्हाट्सअ‍ॅप च नव्हे तर facebook अथवा सरकारही पाहू वा वाचू शकत नाही
> म्हणून नव्या IT नियमाच्या अंमलबजावणीनंतर आपल्या चॅटिंगवर गदा येणार आहे, अशी भीती वापरकर्त्यानी बाळगू नये.

 

Also Read This : 

 

Pune : आईस्क्रीम घेण्यास गेलेल्या 19 वर्षीय तरूणीसोबत 61 वर्षाच्या दुकान मालकानं केले अश्लील चाळे, पुण्यामधील कोथरूडच्या कर्वेनगर भागातील घटना

 

शरीरासाठी घाण्यातून काढलेलं कच्चं तेल खुपच उपयुक्त, जाणून घ्या कसं केलं जातं तयार

 

Central Vista Project : सुरू राहील प्रकल्पाचे काम, दिल्ली HC ने याचिका फेटाळली; याचिकाकर्त्याला 1 लाखाचा दंड

 

कोरोना काळात किचनमधील ‘या’ 5 गोष्टी साफ करण्यास विसरू नका, जाणून घ्या

 

Coronavirus : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केलं तरूण सरपंच ऋतुराज देशमुखांचं कौतुक, ऋतुराजनं केलं कोरोनामुक्त गाव

 

 

Neem Juice : जेवढं कडू तेवढंच फायदेशीर, आजारांना जवळ देखील येऊ नाही देत; जाणून घ्या