देशात इतक्या वेगाने का वाढत आहेत कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण? ICMR ने सांगितलं ‘हे’ कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने वाढत आहे. देशात आता एका दिवसात 60 हजारांपेक्षा अधिक कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 31 लाखांच्या पुढे गेला आहे. यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने याचे कारण सांगितले आहे.

ICMR चे महानिर्देशक बलराम भागवत यांनी मंगळवारी देशात इतक्या वेगाने कोरोना रुग्ण वाढण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले, काही गैरजिम्मेदार लोक मास्क वापरत नाहीत, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नाहीत त्यामुळे भारतात कोरोनाचा प्रसार मोठ्या वेगाने होत आहे. त्यांनी सांगितले की, आयसीएमआरचा आणखी एक नवा सर्वे सुरु आहे, त्याचा रिपोर्ट सप्टेंबर पर्यंत येईल.

भार्गव एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले, ‘मी असं नाही म्हणणार की तरुण किंवा वयस्कर व्यक्ती असं करत आहेत, मी म्हणेल की ज्यांना या परिस्थिची जाणीव नाही असे लोक कोरोनाचा प्रसार होण्यास कारणीभूत आहेत.’ त्यांनी सांगितले, मागे दोन वेळा आयसीएमआरने सर्वे केला होता, त्याचा रिपोर्ट या आठवड्याच्या शेवटी इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे.

केंदीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, कोरोना चाचणी मध्ये वाढ करण्यात आल्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा कमी होत आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 24 तासात 6,423 ने कमी झाली आहे. सध्या कोविड-19 चाचण्या वाढवण्यात आल्या असून, एका दिवशी 10 लाख लोकांमागे 600 पेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत आहेत. भार्गव म्हणाले, ‘भारतात सध्या 1,524 कोविड-19 तपासणीसाठीच्या प्रयोगशाळा आहेत आणि 25 ऑगस्ट 2020 पर्यंत 3,68,27,520 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.’