अबब ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विमान प्रवास खर्च तब्बल ५७ कोटी ६२ लाख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे प्रमुख म्हणून त्यांना संपूर्ण राज्यात फिरावे लागते. मग तो सरकारी कार्यक्रम असो अथवा पक्षाचा. राज्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायचे तर विमान, हेलिकाॅप्टर, चॉपर यांचा वापर करावा लागणारच. पण त्यासाठी किती खर्च करावा. त्यांनी तब्बल ५७ कोटी ६२ लाख १८ हजार रुपये विमान प्रवासावर गेल्या ५ वर्षात खर्च केले आहेत. आणि इतका मोठा खर्च करणारे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

राज्यात सत्तेवर आल्यापासून आक्टोंबर २०१४ ते मे २०१९ या कालावधीत त्यांनी इतका खर्च आपल्या फक्त हेलिकॉप्टर, चॉपर, खासगी जेट विमानाच्या वाहतूकीसाठी केला आहे. माहिती अधिकारात मुख्यमंत्री सचिवालयातून ही माहिती देण्यात आली आहे.

राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना अनेकवेळा विमान अथवा हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागतो. सरकारकडे स्वत:च्या मालकीचे छोटे विमान आणि हेलिकॉप्टर आहे. गेल्या साडेचार वर्षात या हेलिकॉप्टरमध्ये वारंवार बिघाड झाले. तर चारवेळा स्वत: मुख्यमंत्री बालंबाल बचावले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रवासासाठी खासगी जेट विमानाचा वापर करण्यात आला. सर्वात जास्त म्हणजे २० कोटी २० लाख रुपये खर्च २०१८-१९ या वर्षात झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे. २०१७-१८ या वर्षातला खर्च हेलिकॉप्टर भाड्याने घेतल्यामुळे आला आहे. तर याच वर्षात १३ कोटी २४ लाखाचा खर्च हा विमान आणि पायलट यांच्यावरील आहे, असेही या माहितीत नमूद करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विमान प्रवासास दर वर्षी झालेला खर्च 
वर्ष                    खर्च
२०१४-१५          ५,३७,६३,६१८
२०१५-१६          ५,४२,८१,६४६
२०१६-१७           ७,२३,६८,९५०
२०१७-१८           ६,१३,०३,६८५
याच वर्षात         १३,२४,२१,८०३
२०१८-१९           २०,२०,७८,३१३
एकूण                ५७,६२,१८,०१५

आरोग्यविषयक वृत्त –

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा

‘हा’ आहे जपानी सर्वात स्वस्त उपाय ज्याने तुम्ही ठेवू शकतात तुमचे वजन नियंत्रणात

मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान