पुण्यात बालाजी युनीवर्सिटी स्थापनेस मान्यता, हे आहेत राज्य मंत्रीमंडळातील महत्त्वाचे ६ निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याच्या मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकित महत्त्वाचे सहा निर्णय घेण्यात आले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील दर्जा वाढावा यासाठी खासगी विद्यापीठांना मान्यता देण्याची भूमिक राज्य सरकारने घेतली आहे. बैठकित पुण्यात आणि नागपूरात दोन युनिवर्सिटी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. त्यावेळी शिक्षणासोबतच जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या धरण क्षेत्रांजवळ असलेली विश्रामगृहे आणि रिक्त वसाहतींचा विकास आणि व्यवस्थापन सार्वजनिक व खासगी सहभाग (PPP) तत्वावर करण्याच्या धोरणाला मंजूरी देण्यात आली. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वीज वितरण प्रणालीच्या विद्यूत पायाभूत सुविधांवर कर आकारण्यात येऊन नेय यासाठी अधिनियमांत सुधारणा करण्यात येणार आहे.

हे आहेत सहा निर्णय

१. जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या धरण क्षेत्रानजीकच्या विश्रामगृहे व रिक्त वसाहतींचा विकास आणि व्यवस्थापन सार्वजनिक खासगी सहभागातून खासगी यंत्रणांकडून करण्याच्या धोरणास मान्यता देण्यात आली आहे.

२. निम्न तापी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील साने गुरुजी सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या विशेष दुरुस्तीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

३. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वीज वितरण प्रणालीच्या विद्यूत पायाभूत सुविधांवर कर आकारण्यात येऊ नये यासाठी अधिनियमांत सुधारणा केली जाणार

४. पंढरपूर मंदिर अधिनियम १९७३ मध्ये सुधारणेचा निर्णय

५. नागपूर येथे रामदेवबाबा युनीवर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाला मंजूरी

६. पुण्यात बालाजी युनीवर्सिटीज या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेला मंजूरी

आरोग्यविषयक वृत्त

केसांसह त्वचेसाठीही आवळा गुणकारी ; रसाने त्वचा होईल गोरी

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका