‘त्यांचं’ सरकार सत्तेत आलं नाही हे फडणवीस अद्यापही पचवू शकलेले नाहीत, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांकडून ‘टोला’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – आज विधासभा अधिवेशनाचा नागपूरातील दुसरा दिवस आहे. यावेळी सभागृहात विरोधी पक्ष भाजपकडून विविध मुद्दे उपस्थित करत मोठा गोंधळ घालण्यात आला. यावर मुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता सरकारला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुनावले आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले.

अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी फडणवीस सरकारकडून सभागृहात करण्यात येत असलेल्या गोंधळावर भाष्य केले. यावेळी सरकार सत्तेत आलं नाही हे देवेंद्र फडणवीस अजून पचवू शकले नाहीत असे म्हणून फडणवीसांना चिमटा काढला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीवरुन फडणवीस आणि विरोधत सभागृहात गोंधळ घालत आहेत. खरतर सरकार आलं नाही ही बाब फडणवीस अजून पचवू शकले नाहीत. नव्या सरकारचा हा पहिला क्लास आहे. आता सरकार राज्याच्या विकासासाठी काम करत आहे. आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत.

फडणवीसांवर हल्लाबोल करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की आज फडणवीस सरकारचे 4 लाख कोटी रुपयांचे कर्ज राज्यावर करुन ठेवले आहे. कंपन्यांकडून देखील कर्ज घेण्यात आले आहे, एकूण कर्जाचा भार पाहिला तर राज्यावर 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. यातून आम्हाला बाहेर पडत राज्याचा कारभार पाहायचा आहे. यावेळी त्यांनी विश्वास दिला की राज्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे त्यासाठी आम्ही काम करत आहोत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/