दिल्ली सरकारचं ‘अनुकरण’ करतंय फडणवीस सरकार !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पार्टी आणि दिल्लीतील आप सरकार यांच्यातून विस्तवही जात नाही. दोन्ही पक्ष एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाही. राजकीय आघाडीवर टीका टिप्पणी होत असली तरी अरविंद केजरीवाल सरकारने दिल्लीमध्ये अनेक चांगल्या गोष्टी केल्या. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांतीकारी प्रयोग केले. त्याची देशा परदेशातून दखल घेण्यात आली. त्याचे अनुकरण अनेक राज्यात सुरु झाले आहे.

महाराष्ट्र सरकारनेही त्यांच्या ‘मोहल्ला क्लिनिक’ प्रमाणे महाराष्ट्रात ही आरोग्य योजना राबविण्याचा निणर्य घेतला आहे. दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात ६० ठिकाणी ‘आपला दवाखाना’ उघडण्यात येणार आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने गोरगरीबांच्या मोठ्या वस्ती असलेल्या भागात ‘आपला दवाखाना’ सुरु करण्यात येणार आहे. त्यातील १० दवाखाने नाशिकला उघडले जातील, असे सार्वजनिक वाहतूक व आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने सर्व सामान्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी ‘मोहल्ला क्लिनिक’ हा प्रयोग दिल्लीत सुरु केला. त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांवर चांगले व मोफत उपचार होऊ लागले. दिल्ली शहरात आतापर्यंत २०१ मोहल्ला क्लिनिक सुरु झाले असून त्यात प्रत्येक ठिकाणी ओपीडीत साधारण १०० ते १५० लोकांवर दररोज उपचार केले जातात. आता ही क्लिनिक दोन पाळ्यांमध्ये १२ तास सुरु ठेवण्याचा सरकारचा विचार आहे. अशी १ हजार क्लिनिक सुरु करण्याचा दिल्ली सरकारचा विचार आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

Loading...
You might also like