शासकीय जाहिरातींवर ‘PM’ मोदींचे ‘छायाचित्र’ लावा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित शासकीय जाहिरातीवर पंतप्रधान मोदींचे ही छायाचित्र असावे अशी मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय योजनांच्या जाहिरातींवर पंतप्रधान मोदींचे छायाचित्र छापण्यात यावे असे सांगण्यात आले असताना छायाचित्र छापण्यात येत नसल्याने देवेंद्र फडणवीस यांनी यावर आक्षेप घेतला आहे.

सरकारच्या आणि शासकीय योजनांच्या जाहिरातीवर पंतप्रधान मोदींचे छायाचित्र लावण्यात यावे. अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. यापूर्वी काही आमदारांनी देखील अशी मागणी केली होती परंतु याची दखल सरकारने घेतली नाही. त्यामुळे आता हे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. मुख्यमंत्र्यांकडून यावर अद्याप कोणतेही उत्तर आलेले नसले तरी मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेतल्याचे कळते आहे परंतु यावर अद्याप खुलासा झालेला नाही.

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून ज्या शासकीय जाहिराती येत आहे. त्या जाहिरातींवर फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे छायाचित्र देण्यात येत आहे. यावर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मागणी केली आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंतप्रधानांचे छायाचित्र छापण्यात यावा.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like