माजी मुख्यमंत्रयांनी ‘त्या’ शेतकर्‍यांची नावे जाहीर करावीत !

पोलिसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सदोष बीटी कापूस बियाण्यांचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी सरकारने काही शेतकर्‍यांना 14 ते 18 लाख रुपये नुकसानभरपाई दिल्याचा फडणवीस यांचा दावा दिशाभूल करणारा असून फडणवीस यांनी ज्यांना 14 ते 18 लाख भरपाई दिली, त्यांची नावे जाहीर करावीत, असे खुले आव्हान शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी दिले आहे.

फडणवीस यांनी अमरावतीत पत्रकारपरिषदेत सदोष बीटी उपरोक्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विजय जावंधिया यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागातील शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींकडून माहिती घेतली, तेव्हा कुण्याही शेतकर्‍याला अशा स्वरूपाची भरपाई मिळाल्याचे ऐकिवात नसल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकारच्या काळात कापसाचा हमी भाव 5 हजार 600 ते 5 हजार 800 रुपये क्विंटलचाच आहे. मात्रा, विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकार परिषदेत बियाणे कायद्यात शेतकर्‍यांच्या संरक्षणाची तरतूद कशी आहे, याची माहिती दिली. सदोष बियाणांमुळे होणार्‍या नुकसानाची भरपाई फक्त बियाणे देऊनच नाही, तर एकरी उत्पादनाबाबत प्रचारात संबंधित बियाणे कंपनीने त्याला हमी भावाने गुणाकार करून येणारी रक्कम नुकसानभरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी आपण केली आहे. ही मागणी करताना तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात 2018 मध्ये सदोष बीटी कापूस बियाण्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. शेतकर्‍यांना 14 ते 18 लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई त्यावेळी सरकारने मिळवून दिली, हा दावा तुम्ही केला. तो सिद्ध करण्यासाठी त्या शेतकर्‍यांनी नावे जाहीर करावीत, अशी मागणी विजय जावंधिया यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.