फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळं ‘महाविकास’ बुचकळ्यात, आघाडीच्या ‘भवितव्या’वर प्रश्नचिन्ह !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यातील राजकारण महिनाभर ढवळून निघाले. भाजपचे सत्तास्थापनेचे प्रयत्न आणि शरद पवारांचा डावपेच यामुळे राजकारणात वादळ उठले होते. अखेर महाविकासआघाडीने सत्तास्थापन केली. परंतू हे सरकार औटघटकेचे ठरेल असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. यावरुन भाजप अजूनही प्रयत्नशील असल्याचे देवेंद्र फडणवीसांच्या एका वक्तव्यवरुन समोर आले.

सरकार स्थापनेनंतर विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. भाजपच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आला नाही. काँग्रेस नेते नाना पटोले यांची अध्यक्षपदी निवड झाली. भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. सत्ताधारी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांचे कौतूक केले. तर काहीने फडणवीसांवर टीका देखील केली.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूकीदरम्यान मी पुन्हा येईन चे नारे दिले होते. परंतू आता हे वक्तव्य आता गंमतीचा विषय बनला आहे. यावरुनच जयंत पाटलांकडून आणि छगन भुजबळ यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली.

परंतू फडणवीस यांनी देखील महाविकासआघाडीला आव्हान देण्यात आले. मी पुन्हा येईन असे म्हणत भुजबळ तुमच्यासोबत येईल असा टोला देखील फडणवीस यांना हाणला. याच कारणाने भाजप अजूनही राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्यास इच्छूक आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शरद पवारांना जेव्हा याबाबत विचारण्यात आले तेव्हा फडणवीसांनी ऐनवेळी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यात काही तथ्य नाही.

Visit : policenama.com