पुलवामातील हल्ला, ५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान मोदींचं अपयश : शरद पवार

बारामती : पोलिसनामा ऑनलाईन – काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या तुकडीवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय नेते, कलाकार मंडळी तसेच सामान्य नागरिकांमधून देखील या हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील निषेध व्यक्त केला आहे. संपूर्ण देश शहिदांच्या पाठीशी आहे. पण पुलावामातील हल्ला म्हणजे ५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान मोदींचे अपयश असे म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली. बारामती येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

हेही वाचा – पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात राज्यातील २ जवान शहीद 

यावेळी बोलताना शारद पवार म्हणाले, या दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करणे हे शहाणपणाचं नाही आणि ते मी करणार नाही. पण यापूर्वी जे काही घडलं त्याची मी आठवण करून देतो असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान नसताना जे वक्तव्य केले होते त्याची आठवण करून दिली. तेव्हा देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते तेव्हा अशा घटना झल्यानंतर मोदींनी त्यांचा निषेध केला होता. तेव्हा मोदी म्हणाले होते , ‘निषेध पत्रक पाठवून उपयोग नाही एकदा त्यांना अक्कल शिकवली पाहिजे, अक्कल शिवण्याची ताकद  त्यांच्यात नाही ती आम्हा ५६ इंची छातीवाल्यांच्यात आहे ‘ या मोदींच्या वक्तव्याची आठवण पवार यांनी यावेळी बोलताना सांगितली. आता पुलवामा मध्ये घडलेली घटना म्हणजे या सरकारचं किंबहुना ५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान मोदींचे अपयश आहे असे पवार म्हणाले.
या हल्ल्यात शेजारच्या देशाचा हात 
या हल्ल्यामध्ये शेजारच्या देशाने दहशतवाद्यांना मदत केली हे उघडपणे दिसते आहे. दहशतवाद्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आलेले आहेत आणि ते प्रशिक्षित होते. याचा अर्थ त्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. हे उघड आहे संपूर्ण माहिती घेऊन पूर्वनियोजित पद्धतीने हा हल्ला घडविण्यात आला आहे. असे एकूण दिसते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला हा हल्ला थोपविण्यात अपयश आले असे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – पुलवामा दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरा 

मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात असे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असत. मी मात्र आता राजीनाम्याची मागणी करणार नाही पण याबाबत सरकारचे अपयश या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले असे पवार म्हणाले.