‘डिजिटल महाराष्ट्र’ हे स्वप्न देखील भाजपचं ‘गाजर’ : ‘दादां’चा सत्ताधाऱ्यांना टोला

मुंबई : वृत्तसंस्था – पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सत्ताधारी फडणवीस सरकारची कोंडी करण्यात विरोधकांनी यश मिळविल्याचे चित्र पाहावयास मिळाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाचे कामकाज प्रसारित करता येत नसेल तर डिजिटल महाराष्ट्रचं स्वप्न हे गाजरच आहे हे कळतं अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर उपहासात्मक टीका करताना केवळ जाहिरातीपुरते डिजिटल महाराष्ट्र आहे का ? असा सवालही केला.

पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली मात्र सरकारच्या वेबसाईट वरुन विधीमंडळांचे कामकाज प्रसारीत होत नसल्याचे पाहून अजितदादा पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा समाचार घेतला. विधीमंडळाच्या वेबसाईटवरील थेट प्रक्षेपण बंद असल्याने पावसाळी अधिवेशन अजूनही जनतेला पाहता आलेले नाही. डिजिटल महाराष्ट्र केवळ जाहिरातीपुरताच आहे, असा संदेश सरकार देत आहे का? असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला.

आरोग्य विषयक वृत्त –

#YogaDay2019 : मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’

#YogaDay2019 : उंची वाढविण्यासाठी करा ‘ताडासन’

#YogaDay2019 : योगामुळे कमी होते नैराश्याची तीव्रता

आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत लिंबाची पाने