मलाइकासह बॉलिवूडमधील ‘या’ 9 ‘डस्की ब्युटीज’नी सिद्ध केलं की, रंग मॅटर करत नाही !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : रंगावरून अनेकदा भेदभाव पहायला मिळतो. परंतु बॉलिवूडमध्ये अशा काही डस्की ब्युटी आहे ज्यांचा रंग त्यांच्या ध्येयाच्या आड कधीही आला नाही. आज त्या करिअरमध्ये टॉपवर आहेत.

1) बिपाशा बसु – एक वेळी अशी होती , बिपाशा बसु हिंदी सिनेमाची जान होती. तिचे सिनेमे आणि गाणी आजही खूप फेमस आहेत.

2) प्रियंका चोपडा – प्रियंका आज एक ग्लोबल स्टार बनली आहे. बॉलिवूडसोबतच तिनं हॉलिवूडमध्येही खूप नाव कमावलं आहे. प्रियंका युएनची गुडविल अ‍ॅम्बेसेडरही आहे.

https://www.instagram.com/p/B-mP_6DjwWF/

3) दीपिका पादुकोण – दीपिका आज एक महागडी अ‍ॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. तिची चर्चा हॉलिवूडपर्यंत आहे. मेंटल इलनेसमध्ये जागरूकता करण्यातही दीपिकानं मोठं योगदान दिलं आहे.

4) कोंकणा सेन – कोंकणानं आपल्या टॅलेंटच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. गेल्या अनेक दशकांपासून ती इंडस्ट्रीचा हिस्सा आहे. तिनं अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

5) मलायका अरोरा – मलायका इंडस्ट्रीत सक्रिय नसली तरी सर्वात चर्चेत राहणारी सेलिब्रिटी आहे. ब्युटी आणि फिटनेससाठी ती खूपच फेमस आहे.

6) शिल्पा शेट्टी – एकेकाळी बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावणारी शिल्पा आता फिटनेस गुरू म्हणून ओळखली जाते. तिच्या लुकची चर्चाही खूप होत असते.

7) चित्रांगदा सिंह – चित्रांगदादेखील उत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा अभिनय आणि सिनेमे चाहत्यांना खूप आवडतात.

8) लारा दत्ता – लारा दत्ता बॉलिवूडमधील सर्वात सेक्सी अ‍ॅक्ट्रेसपैकी एक मानली जाते. तिच्या लुकची कायमच चर्चा होत असते.

9) ईशा गुप्ता – बॉलिवूडमधील बोल्ड अ‍ॅक्ट्रेसपैकी एक मानली जाते. ईशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहते. ती नेहमीच आपले फोटो सोशलवर शेअर करत असते जे व्हायरल होताना दिसत असतात.