नरेंद्र मोदींच्या काळातील ‘ते’ ३ एन्काऊंटर फेक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ ते २००७ दरम्यानच्या काळात झालेल्या १८ एन्काऊंटरपैकी ३ एन्काऊंटर फेल असल्याचा अहवाल जस्टीस एच. एस. बेदी समितीने दिला आहे. मात्र, त्याचवेळी त्यात कोणत्याही राजकीय नेत्यांचे नाव या समितीने दिलेल्या अहवालात नसल्याने मोदी सह इतरांना दिलासा मिळाला आहे.

बेदी समितीने आपला २२१ पानी अहवाल दिला असून त्यात त्यंlनी एकूण १८ एन्काऊंटरची तपासणी केली. त्यात तपासणी अहवाल, फॉरेंन्सिक टेस्ट रिर्पोट, साक्षीदारांनी दिलेला जबाब याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर बेदी यांनी १८ पैकी १५ एन्काऊंटर ही खरी असून त्याबाबत कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. इतर तीन प्रकरणात ९ पोलीस अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची शिफारस केली आहे.

अहमदाबाद येथे २००२ मध्ये समीर खान यांचा एन्काऊंटर करण्यात आला होता. त्यातील पोलीस निरीक्षक के़ एस वाघेला आणि टी़ ए़ बारोत यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा. समीर खान यांचा भाऊ सरफराज व वडिलांना १० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी.
१३ एप्रिल २००६ रोजी कासिम जफर यांचा इनकाऊंटर फेक असल्याचे बेदी समितीचे मत बनले. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक जे. एम़ भारवाड आणि काँस्टेबल गणेशभाई यांच्यावर गुन्हा दाखल करावा. जाफरची पत्नी व तिच्या पाच मुलांना १४ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी.

हाजी इस्माईल यांचा ९ आक्टोंबर २००५ रोजी इनकाऊंटर झाला होता. यात पाच पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us