तोतया ASI बनून मास्क न घालणार्‍यांकडून करत होती वसुली, ‘या’ पध्दतीनं पकडली गेली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची राजधानी दिल्लीत एक खळबळजनक प्रकारण समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी एका तोतया महिला एएसआयला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तमन्ना जहां नावाची एक महिला पोलिसांच्या गणवेशात वावरायची, तिच्या खांद्यावर एक स्टार असायचा, एएसआय असल्याचे ती सांगायची. सोबत चलान बुक ठेवत असे आणि कुणी विना मास्क दिसले तर त्यास पकडून तोबडतोब चलान बुक उघडून 500 रूपयांची पावती फाडत असे.

तमन्ना अशाप्रकारे गणवेश घालत असे की एखादा पोलिसवाला जरी समोर आला तरी तिला ओळखू शकणार नाही. तमन्ना नेमप्लेट सुद्धा लावत असे आणि कठोरपणे लोकांशी बोलत असे, जेणेकरून कुणीही तिच्यावर शंका घेणार नाही.

बुधवारी नेहमीप्रमाणे तमन्ना सकाळच्यावेळी गणवेश घालून चलान बुक घेऊन शिकारीच्या शोधात बाहेर पडली, परंतु बुधवार तिच्यासाठी चांगला दिवस नव्हता. जेव्हा तमन्नाने मास्क नसलेल्या एका व्यक्तीला रोखले आणि चलान भरण्यास सांगितले तेव्हा त्या व्यक्तीस शंका आली आणि त्याने तोबडतोब टिळक नगर पोलीस ठाण्यात संपर्क साधला. टिळक नगर पोलीस ठाण्याची टीम ताबडतोब घटनास्थळी आली आणि महिलेला अटक केली. पोलीस आता याचा शोध घेत आहेत की, अखेर तमन्नाने बनावट चलान बुक, गणवेश आणि नेमप्लेट कुठे बनवली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like