संतापजनक ! उपचाराच्या नावाखाली नातेवाईकांसमोरच ढोंगी बाबाचे मुलीवर लैंगिक अत्याचार

गोंदीया : पोलीसनामा ऑनलाईन – उपचार करण्याच्या बहाण्याने १७ वर्षीय मुलीवर एका ढोंगी बाबाने घरात डांबून ठेवत सलग पाच दिवस लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ढोंगी बाबाचा पर्दाफाश कऱण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

लंकेश उर्फ वामनराव मेश्राम (३०) असे अटक करण्यात आलेल्या ढोंगी बाबाचे नाव आहे.

गोंदीया शहरातील एका कुटुंबात महिला आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होत्या. दरम्यान त्यांच्या घरातील एका १७ वर्षीय मुलीला छातीला गाठ आली होती. ती दुरुस्त करण्याचा दावा ढोंगी बाबा मेश्राम याने केला. त्यानंतर त्याला उपचारासाठी २७ मार्चला घरी बोलविण्यात आले. तेव्हा त्याने घरातील मंडळींना काळ्या रंगाची गोळी खायला दिली.

त्यामुळे सर्वांना गुंगी यायची. २७ मार्च पासून त्याने ४ एप्रिल पर्यंत सर्वांना गुंगीत ठेवले. दरम्यान ३१ मार्च रोजी त्याने १७ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही. मात्र १ ते ४ एप्रिल दरम्यान त्याने सलग तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान तिची मावशीसुद्धा त्याच खोलीत बसून होती. परंतु कोणीही काहीच करू शकत नव्हते. त्यानंतर कामानिमित्त बाहेरगावी गेलेले पिडीतेचे काका परत आले. तिचे वडीलही गावी गेले होते. दरम्यान काकाने त्यांच्या पत्नीला बोलविण्यासाठी धाव घेतली. तेव्हा घराला बाहेरून कुलुप होते.

शेजाऱ्यांन विचारल्यावर त्यांनी आठवडाभरापासून कुलुप आहे परंतु आत सर्वजण आहेत असे सांगितले. त्यानंतर कुलुप तोडले तेव्हा घरात सर्वजण गुंगीच्या अवस्थेत दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकिस आला. तेव्हा शेजारील लोक जमा झाले. त्यानंतर त्याला लोकांनी चांगलाच चोपला. त्याच्यावर गोंदीया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखळ करत पोलिसांनी अटक केली. त्याची रवानगी आता भंडारा येथील तुरुंगात करण्यात आली आहे.