2 नवविवाहीत महिलांनी लग्नानंतर केला ‘हा’ कारनामा, पोलिसांना माहिती झाल्यानंतर ‘भंबेरी’ उडाली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या भरतपूरमध्ये दोन वधूंनी असा कारनामा केली की तुम्ही ऐकून दंग व्हालं. दोन नव विवाहित महिलांनी सासरच्यांच्या जेवणात गुंगीचे औषध टाकले आणि ते बेशुद्ध झाल्यानंतर या महिलांनी सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम घेऊन घरातून पळ काढला. या लुटारु नवविवाहीत महिलांना जवळपास 9 महिन्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. याशिवाय त्यांच्या टोळीतील इतर सदस्यांना देखील ताब्यात घेण्यात आले. फरार झालेल्या या लुटारुंना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक नेमण्यात आले होते. ज्यांनी उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंडात तपास केला तेव्हा कुठे जाऊन यातील दोन गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

हा प्रकार चिकसाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. 8 नोव्हेंबरला दोन सख्खे भाऊ असलेल्या नाहर सिंह आणि रमेश सिंह यांचा विवाह सख्ख्या बहिणी असलेल्या सीमा आणि शिवानीबरोबर झाले. परंतू लग्नाच्या 5 दिवसानंतर दोन्ही नवविवाहीत महिल्यांनी घरातील सर्वांना गुंगीचे औषध जेवणातून देऊन बेशुद्ध केले आणि घरातील दागिणे, रोख रक्कम घेऊन पसार झाल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर कुटूंबातील सर्व लोक शुद्ध आल्यावर ही घटना लक्षात आली. त्यानंतर त्यांना आरबीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या महिलांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. लग्नाच्या बदल्यात टोळीच्या प्रमुखाने मुलाच्या वडीलांकडून म्हणजेच अमरसिंह यांच्याकडून 2 लाख रुपये पहिल्यांदाच घेते होते. लुटण्यात आलेले सोन्याच्या दागिण्यांची किंमत जवळपास 6 लाख रुपये होती आणि रोख 2 लाख 10 हजार रुपये होते.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान तथ्य समोर आले. दोन्ही नवविवाहित महिला या सख्या बहिणी नसून एका टोळीच्या सदस्या आहेत, ज्या पहिल्यापासून विवाहीत आहेत. लग्नात नवविवाहीत महिलेची वहिणी असलेल्या महिलेचे नाव कमला देवी आहे, ती देखील या टोळीची सदस्य आहे. सध्या या महिलांच्या राहण्याचे ठिकाण उत्तरप्रदेशच्या बरेलीचे आहेत, पोलिसांची तपास सुरु केला हे लक्षात आल्यावर हे सर्व सदस्य फरार झाले आहेत. पोलीस आता फरार असलेल्याचा शोध घेत आहे.

लग्नात स्वत:चे नाव सीमा सांगणारी महिलेचे खरे नाव अंजली आहे आणि दुसरीचे नाव भावना आहे. या टोळीत राहून अविवाहित तरुणांशी विवाह जुळवत आणि लग्न करत होत्या. या टोळीत 7 सदस्य आहेत आणि ते फरार आहेत. त्यातील 2 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ही एक टोळी आहे जी मुलीचे लग्न त्या व्यक्तीबरोबर लावत होते जे लग्न करण्याच्या विचारात आहे. ज्याचे वय जास्त असेल, त्यामुळे लग्नाच्या विचारात असलेले वय जास्त झालेले तरुण या टोळीच्या जाळ्यात पटकन फसत असतं. लग्नानंतर संधी साधून या महिला नातेवाईकांच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून त्यांना बेशुद्ध करुन घरात सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम लंपास करत असतं.

हे सत्य आहे की भरतपूर जिल्हा, जेथे उद्योग धंदे नाहीत, शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था नाही तेथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथील तरुणांचे लग्न होत नाही. त्यामुळे ते अविवाहीत राहतात. त्यामुळे उत्तरप्रदेश हरियाणा या भागात अशा फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत.

येथील ज्या तरुणांचे लग्न झाले नाही ते सहज अशा प्रकारच्या टोळ्यांच्या जाळ्यात अडकतात. बिहार, उत्तरप्रदेशमध्ये या टोळ्या लग्न करुन तरुणांची फसवणूक करतात. लग्न करुन काही दिवसात या महिला घर साफ करुन फरार होतात.

Visit : Policenama.com