Fake Call Centre Mumbai | मुंबईत 2 बनावट कॉलसेंटरवर छापे, दोघांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – मुंबईत सुरु असलेल्या 2 बनावट कॉल सेंटरचा (Fake call centre busted) पदार्फाश करण्यात मुंबई पोलिसांना (Mumbai Police) यश आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch,) मालाड (Malad) येथील 70trade. com आणि मेक बिझनेस सॉल्यूशन या कॉलसेंटरवर छापे टाकून ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कॉलसेंटरमधून नफा देण्याच्या नावाखाली परदेशी नागरिकांची फसवणूक केली जात होती. fake call centre busted in mumbai malad crime branch taken action two arrested

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आदित्य माहेश्वरी, गिरीराज दमानी (Aditya Maheshwari, Giriraj Damani) असे अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 70trade. com आणि मेक बिझनेस सॉल्यूशन या नावाने हे दोन्ही बनावट कॉलसेंटर चालविले जात होते. कॉलसेंटरमधून नफा देण्याच्या नावाखाली परदेशी नागरिकांची फसवणूक (fraud) केली जात होती. फसवणूक झाल्याचे समजताच परदेशी नागरिक कॉल करुन या कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र VOIP कॉल असल्याने परदेशी नागरिकांचा संपर्क कंपनीसोबत होत नव्हता. याची माहिती मिळताच मुंबईच्या गुन्हे शाखेने दोन्ही कॉल सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी दोन्ही कॉल सेंटरमध्ये एकूण 75 हून अधिक लोक काम करत होते. यावेळी आदित्य माहेश्वरी, गिरीराज दमानी या दोघांना अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन सर्व्हर, हार्ड डिस्क जप्त केले असून प्रत्येक कॉम्प्यूटरचे स्क्रीन शॉर्ट्स घेतले आहेत.

Web Title :- Fake Call Centre Mumbai | fake call centre busted in mumbai malad crime branch taken action two arrested

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

महाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या

विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! पुढील वर्षापर्यंत मिळत राहील घर बांधण्यासाठी नाममात्र व्याज दरावर अ‍ॅडव्हान्स

महाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या

Thackeray Government | ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे छगन भुजबळ संतापले, म्हणाले…