बनावट नाेटा टाेळीची पाळेमुळे पश्चिम बंंगालपर्यंत : एटीएस पथक सांगलीत दाखल

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन

सांगलीतील मुख्य बसस्थानकाजवळ चार जणांच्या टोळीने दोन हजारांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला हाेता.  तसेच बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीची व्याप्ती राज्यभर असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले हाेते. या टोळीने राज्यात तब्बल पाच कोटींच्या बनावट नोटा चलनात आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला हाेता. सांगली व मुंबईतून संशयीतांना पाेलीसांनी अटक केली आहे. दरम्यान या टाेळीची पाळेमुळे पश्चिम बंगालपर्यंत असल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी याप्रकरणाची कसून तपासणी करण्यात येत आहे. तपासासाठी एटीएसची मदत घेण्यात आली असून, एटीएसचे एक पथक सांगली शहरात दाखल झाले असल्याचे पाेलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’753e9587-b33e-11e8-b720-7d0303507737′]

सांगली शहर पोलिसांनी बनावट नोटा खपवणार्‍या एकाला ताब्यात घेतल्यानंतर त्यातील सुत्रधारासह पाचजणांना अटक केली आहे. याप्रकरणी प्रेमविष्णू राफा, राज सिंग, नरेंद्र ठाकूर, मनिष ठाकुरी, जिलानी शेख यांना अटक करण्यात आली आहे. पाचही संशयितांकडे केलेल्या चौकशीत याची पाळेमुळे पश्‍चिम बंगालपर्यंत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय या प्रकऱणाची व्याप्ती पाहता यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. आंतरराज्य टोळी यात कार्यरत असल्याने याच्या तपासासाठी एटीएसची मदत घेण्यात येत आहे. यासाठी एक पथक शनिवारी सांगलीत दाखल झाले आहे. अशी माहिती अधीक्षक शर्मा यांनी दिली.

जाहिरात

अटकेत असलेल्या अाराेपिंची पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे. राफा, ठाकुरी आणि जिलानी शेख हे  प्रमुख तीन संशयित असून सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यामुळे शिवाय यामध्ये देशविघातक शक्ती कार्यरत असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांच्या पथकासह या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसचीही मदत घेण्यात येत आहे. पथकाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर एटीएस आणि पोलिसांचे एक संयुक्त पथक पश्‍चिम बंगालला तपासासाठी पाठवण्यात येणार असल्याचेही अधीक्षक शर्मा यांनी सांगितले.

जाहिरात