‘सोशल’वर फेक ‘धनाजी वाकडे’कडून पवार, गांधी, राज ठाकरेंच्या बदनामीचा मजकूर व्हायरल, सायबर पोलिसांकडे तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर कडाडून टीका करताना दिसत आहेत. सध्या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, युट्युब अशा अनेक सोशल मीडियावर शरद पवार, सोनिया गांधी, राज ठाकरे यांची बदनामी करणारा मजकूर आणि फोटो शेअर होताना दिसत आहे. पुन्हा एकदा हा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सध्या सर्व पक्ष आपापला प्रचार करण्यात व्यस्त आहेत. कारण सध्या हा प्रचार अखेरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. सध्या अनेक नेत्यांचे जुने व्हिडीओ, फोटो, जुनी भाषणे शेअर होताना दिसत आहेत. अनेक नेत्यांविषयी समाजात गैरसमज पसरवला जाताना दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून फोटोंचं मॉर्फिंग केलं जात आहे ज्यामुळे नेत्यांच्या चारित्र्यावर प्रहार केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आणि काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती.

फेसबुकवर एक पेज आहे ज्यावर शरद पवार, सोनिया गांधी, राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांबाबत बदनामी करणारा मजकूर फोटोंमध्ये बदल करून व्हायरल केला जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंगवी यांनी शुक्रवारी सायबर पोलिसांकडे दिली आहे. राजकारण महाराष्ट्राचे असे या पेजचे नाव आहे. शिंगवी यांना या पेजला जोडले जाण्यासाठी रिक्वेस्ट आली. ‘धनाजी वाकडे’ या बनावट नावाने अनोळखी व्यक्ती हे पेज चालवत असल्याचे त्यांनी सांगितले. या नेत्यांबद्दल मजकूर व्हायरल केल्याने आपल्या भावना दुखावल्याचे शिंगवी यांनी तक्रारीत उल्लेख केला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी