बनावट चकमक प्रकरण : मेजर जनरलसह ७ लष्करी अधिकाऱ्यांना जन्मठेप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आसाममध्ये पाच तरूणांची बनावट चकमकीत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ७ लष्करी आधिकाऱ्यांना दिब्रूगड जिल्ह्याच्या डिंजन येथील २ इन्फॅट्री माउंटन विभागातील कोर्ट मार्शलमध्ये आर्मी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ज्या अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली त्यांत माजी मेजर जनरल, २ कर्नल आणि ४ जवानांचा समावेश आहे. सर्व दोषी अधिकारी आर्मी कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध आर्मड फोर्सेज ट्रिब्यूनलमध्ये, तसेच सुप्रीम कोर्टात दावा करण्याच्या तयारीत आहेत. १९९४ साली ही बनावट चकमक करण्यात आली होती.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4e9d127-d034-11e8-b6f3-117e4a943067′]

लष्कराच्या मुख्यालयाकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. मात्र, यासंदर्भात आधिकृत माहिती समोर येण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ज्या सात दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यामध्ये मेजर जनरल ए. के. लाल, कर्नल थॉमस मॅथ्यू, कर्नल आर. एस. सिबिरेन, कनिष्ठ कमिशंड अधिकारी आणि नॉनकमिशंड अधिकारी दिलीप सिंग, जगदेव सिंग, अलबिंदर सिंग आणि शिवेंदर सिंग यांचा समावेश आहे. १९९४ मध्ये ऑल आसाम विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते प्रबीन सोनोवाल, प्रदीप दत्ता, देबाजीत बिस्वास, अखिल सोनोवाल आणि भाबेन मोरन यांच्या हत्येप्रकरणी मेजर जनरलसह ७ लष्करी अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

[amazon_link asins=’B01ELLDUBO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e3751d17-d034-11e8-ab03-1b0412d16733′]

अन्य चौघांसोबत पाचही विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांना पंजाब रेजिमेंटच्या एका युनिटने १४ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी १९९४ दरम्यान अटक केली होती. आसाम फ्रंटियर टी लिमिटेडचे जनरल मॅनेजर रामेश्वर सिंह यांची उल्फा दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यानंतर लष्कराने ढोला आर्मी कँपमध्ये ९ जणांना ताब्यात घेतले होते. त्यामधील पाच जणांना २३ फेब्रुवारी १९९४ रोजी डांगरी बनावट चकमकीत मारले होते. अअडण चे तात्कालीन उपाध्यक्ष आणि भाजपा नेता जगदीश भुयान यांनी बनावट चकमक प्रकरणी गुवाहाटी हाय कोर्टामध्ये आवाज उठवला. त्यानंतर या बनावट चकमक प्रकरणावर सीबीआय तपास झाला. ए. के. लाल लेहमध्ये ३ इन्फंट्री विभागामध्ये मेजर जनरल पदावर कार्यरत होते. २००७ मध्ये एका महिलेने त्यांच्यावर अनुचित वागणूक आणि गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते. २०१० मध्ये कोर्ट मार्शलनंतर त्यांना लष्करातून काढून टाकण्यात आले होते.

चार वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ५५ जवान शहीद