अहमदनगर : बनावट फिंगरप्रिंट वापरून :’आधार’ नोंदणी ! तहसीलदारांच्या पथकाची कारवाई

तहसीलदारांच्या पथकाची कारवाई

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – बनावट फिंगरप्रिंट शिक्के वापरून आधार नोंदणी केल्याप्रकरणी राज एंटरप्रायसेस, सावित्रीबाई फुले संकुल, तहसील कार्यालयासमोर व सावेडी येथील इरफान गोल्डन टच या महा ई-सेवा केंद्रावर कारवाई करून हे सेतू केंद्र सील करण्यात आले आहेत. तहसीलदार उमेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पाटील यांच्या कार्यवाहीत निवासी नायब तहसीलदार बारवकर रावसाहेब, सावेडी मंडलाधिकारी,
तलाठी आदींनी सहभाग घेतला होता. दोन सेतू केंद्रांमध्ये बनावट फिंगरप्रिंट शिक्के वापरून दाखले तयार केले जात असल्याची माहिती तहसीलदार पाटील यांना मिळाली होती. त्यावरून आज सायंकाळी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सदर दोन्ही केंद्रावर छापे टाकले. केंद्रावर बनावट फिंगरप्रिंट शिक्के वापरून बनावट आधार नोंदणी केली जात असल्याचे आढळून आले. तहसीलदारांनी सदर सेवा केंद्रांचे रितसर पंचनामे केले व केंद्रांना सील ठोकण्यात आले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सेतू केंद्र चालकाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, असे तहसील प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त