बनावट सोने तारण कर्ज प्रकरणात ‘कर्मचारी’च निघाला ‘मुख्य सुत्रधार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चाकण येथील नगर अर्बन बँकेच्या बनावट सोने तारण कर्ज प्रकरणातील मुख्य सुत्रधार हा बँकेचे व्हॅल्युअर माळवे यांचा कर्मचारीच असल्याचे समोर आले आहे. चाकण पोलिसांनी सतीश शंकर अष्टेकर या मुख्य सुत्रधाराला अटक केली आहे.

चाकण येथील नगर अर्बन बँकेत बनावट सोने तारण ठेवून कोटयावधीचे कर्ज घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी चाकण पोलिसांत बँकेचे चाकण शाखाधिकारी किसन काथवटे यांनी दिलेल्या फिर्यादीचे अनुषंगाने बनावट सोने तारण ठेवून कर्ज मिळवल्याप्रकरणी बँकेच्या व्हॅल्युअर सह एकूण १४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर बँकेचे व्हॅल्युअर विवेक माळवे व इतर कर्जदारांनी खेड सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी धाव घेतली होती. या प्रकरणी सत्र न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांनी बँक व्हॅल्युअर सह काही कर्जदारांना ८ एप्रिल २०१९ च्या आदेशान्वये अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

त्यामुळे गुन्ह्याच्या शोधात अडचणी वाढल्या होत्या. चाकण पोलिसांनी सर्व आरोपींकडे कसून तपास केला असता बँक व्हॅल्युअर विवेक माळवे यांचा कर्मचारी सतीश शंकर अष्टेकर हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी त्याला अटक केली. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याची २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश