‘नकली’ हेल्मेटमुळे डोक्याला आणि डोळ्याला त्रास, विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या देशात आधिक करुन अनेक लोक यासाठी हेल्मेट खरेदी करतात, की त्यांना दंड भरावा लागू नये. खूप कमी लोक आहेत जे सुरक्षेसाठी चांगल्या क्वालिटीचे हेल्मेट विकत घेतात. याच मुळे देशात नकली हेल्मेटची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हेल्मेट सक्ती असल्याने असे नकली किंवा कमकूवत दर्जाचे हेल्मेट लोक स्वस्तात मिळतात म्हणून विकत घेतात.

असे हेल्मेट रस्त्यावर आणि दुकानात १०० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत मिळतात, तर अनेक हेल्मेटवर आयएसआयचे खोटे स्टीकर लावण्यात येते. याच कारणाने देशात नकली हेल्मेटमुळे रस्ते अपघातात अनेक लोकांचे जीव जातात. तसेच नकली हेल्मेटमुळे तुमचे डोळे देखील खराब होतात.

या कमी दर्जा असलेल्या हेल्मेटमुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते, हेल्मेटला लावण्यात येणाऱ्या वाइजर म्हणजेच पुढील पारदर्शक भाग हा UV रे ने सुरक्षित नसतो. ज्यामुळे जास्त उन्हाळ्यात डोळ्यांना त्रास होऊ शकतो. एवढेच नाही तर रात्री समोरुन येणाऱ्या वाहनांची हेडलाईटमुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला डोळ्याचे समस्या निर्माण होऊ शकतात आणि तुमची दृष्टी कमजोर पडू शकते.

परंतू जर तुम्ही चांगल्या दर्जाचे हेल्मेट घेतले तर तुम्हाला असा त्रास होणार नाही, आणि डोळ्याबरोबर याने तुमच्या चेहऱ्यांची त्वचा देखील सुरक्षित राहिलं.

कसे ओळखणार नकली हेल्मेट
स्टीलबर्ड हेल्मेटचे एमडी राजीव कपूर यांच्या मते, आज देशात जवळपास ८० टक्के नकली हेल्मेटची विक्री करण्यात येते, पंरतू हे नकली हेल्मेट ओळखणे सहज शक्य आहे. जर तुम्ही ४५० रुपयांपेक्षा कमी दराचे हेल्मेट विकत घेत असाल तर हे हेल्मेट नकली आणि कमी दर्जाचे आहे. कारण ISI मार्क असलेले हेल्मेट येवढ्या कमी किंमतीत बनवण्यात येत नाही. सरकारच्या सुरक्षा मानकांनुसार एक ISI मार्क असलेले हेम्लेट बनवण्यासाठी कमीतकमी ४५० रुपये खर्च येतो.

हेल्मेट घेताना ही काळजी घ्या
बाजारात विविध रंगांचे आणि डिझाइनचे हेल्मेट उपलब्ध आहेत. परंतू हेल्मेट घेताना ही काळजी घेतली पाहिजे, हेल्मेटचे वाइजर कधीही डार्क रंगाचे असू नये. कारण याने रात्री वाहन चालवताना समस्या येऊ शकते. चांगला दर्जाचे वाइजर असलेले हेल्मेट विकत घ्या. जेणेकरुन डोळ्यांना त्रास होणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

Loading...
You might also like