IAS बनून पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबलला केली मारहाण, निघाला बनावट अधिकारी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थानच्या भरतपूरमध्ये पोलिसांनी एका अश्या व्यक्तीला अटक केली आहे, जो बनावट आयएएस अधिकारी बनून पोलिस एस्कॉर्टची सुविधा घेत होता आणि पोलिस ठाण्यात येऊन सर्व पोलिसांना धमकावत होता. एवढेच नव्हे तर तो शासकीय कर्मचार्‍यांची बदलीच्या नावाखाली फसवणूक देखील करत होता. बनावट आयएएस आपण परराष्ट्र मंत्रालयात तैनात असल्याचे सांगत असल्याचे आपला रुबाब झाडायचा. त्याचा खरा चेहरा तेव्हा पुढे आला, जेव्हा तो आपल्या सासुरवाडीची तक्रार घेऊन चिकसाना पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला, जिथे तो स्वतःला आयएएस अधिकारी असल्याचे सांगून आपली मनमानी करायचा. त्याने पोलिस ठाण्यात एका पोलिस कर्मचा्याला मारहाण देखील केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती रविवारी रात्री उशिरा चिकसाना पोलिस ठाण्यात आला आणि पोलिसांना सांगितले की, मी सौरभ कुमार आयएएस अधिकारी आहे आणि दिल्लीच्या परराष्ट्र मंत्रालयात तैनात आहे. तुमच्या पोलिस स्टेशनवर मी कालच एक आयएएस सुरेंद्रची बदली येथे पोलीस लाईनमधून केली आहे. त्यानंतर त्या पोलिस कर्मचाऱ्याने सौरभ नावाच्या या बनावट आयएएस अधिकाऱ्याला सलाम करून त्याला खुर्चीवर बसवले. पण तो जबरदस्तीने पोलिस ठाण्यात जाऊ लागला. पोलिस कर्मचाऱ्याने थांबवले तर त्याने त्याला चापट मारली.

पोलिसांनी बनावट आयएएसची ओळख सौरभ उर्फ विष्णू रहिवासी लुहासा पोलीस ठाणे, नदबई म्हणून केली आहे. त्याविरोधात पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या मुलांना सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली होती, ज्याला यापूर्वीही अटक करण्यात आली होती. याशिवाय त्याने अनेकदा पोलिस अधिकाऱ्यांना फोनवर आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगत पोलीस एस्कॉर्टची सर्व्हिस घेतली होती. अटकेनंतर पोलिस बनावट आयएएस अधिकाऱ्याकडे चौकशी करण्यात गुंतले आहेत आणि त्याने आणखी किती लोकांना फसवले आहे याचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर कुठे-कुठे पोलिस अधिकाऱ्यांना आयएएस सांगून एस्कॉर्टची सुविधाही मिळविली आहे.

चिकसाना पोलिस ठाण्याचे प्रभारी रामनाथ गुर्जर म्हणाले की, बनावट आयएएस अधिकारी पकडला गेला जो पोलिसांवर आपला रुबाब झाडायचा आणि उच्च पोलिस अधिकाऱ्यांना फोनवरून एस्कोर्ड घेत होता. नोकरी मिळण्याच्या नावाखाली तो लोकांना फसवत असे. सध्या, यासंदर्भात विचारपूस केली जात आहे आणि त्याचे कॉल तपशील काढले जात आहेत जेणेकरून त्याच्या इतर गुन्हेगारी कृत्यांचा तपास केला जाऊ शकेल.