बनावट ओळखपत्रांने रेल्वे प्रवास करणार्‍या 2100 जणांवर कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बनावट ओळखपत्राच्या आधारे लोकने प्रवास करणार्‍या 2 हजार 100 जणांवर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. यात महापालिका कर्मचा-याबरोबर अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय कर्मचा-यासह अन्न विभागाचे कर्मचारी व मोलकरीण तसेच व्यापा-यांचा समावेश आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत 2 हजार 943 विनातिकीट आणि बनावट ओखळपत्राच्या आधारे प्रवास करणा-या प्रवाशांवर कारवाई केली आहे. यातून 11 लाख 72 हजार 280 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अद्याप लोकल सेवा सुरु केली नाही. त्यात ओळखपत्र आणि क्युआर कोडच्या पासवर लोकलने प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. अन्न वाहनांचा खर्च परवडणारा नसल्याने अनेकजण थेट बनावट ओळखपत्राच्या अधारे बिनधक्तपणे प्रवास करताना आढळून आले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने कारवाईचा बढगा उगारला आहे. उपनगरीय मार्गावर बुधवारी दिवसभरात 386 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून 1 लाख 7 हजार 530 रुपयांचा दंड वसूल केला आहे.