सरकारनं दिला इशारा ! नोकरीसाठी मिळाली असेल ऑफर तर व्हा सावध, होऊ शकतं मोठं नुकसान; जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना महामारीत एकीकडे नोकरी (Fake Job) गेल्याने लाखो लोक त्रस्त आहेत. तर दुसरीकडे, सायबर गुन्हेगार या संधीचा फायदा घेऊन नोकरी देण्याच्या अमिषाने लोकांकडून पैसे लुटत आहेत. आता गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs) अशा फ्रॉडबाबत अलर्ट जारी केला आहे. जर तुम्हाला सुद्धा मेल किंवा मेसेजद्वारे नोकरीची (Fake Job) ऑफर आली असेल तर अप्लाय करण्यापूर्वी व्यवस्थित पडताळणी करू घ्या.

काही सायबर गुन्हेगार ऑनलाइन नोकरीच्या संधीसाठी सरकार आणि कॉर्पोरेट संस्थांच्या नावाचा दुरुपयोग करत आहेत. तुमच्या ईमेल किंवा मेसेजिंग अ‍ॅपवर पाठवलेल्या बनावट जॉब अपॉईंटमेंट लेटरपासून सावध रहा.

नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटची ऑथेंटिसिटी चेक करा. गृह मंत्रालयाचे सायबर सिक्युरिटी ट्विटर हँडल सायबर दोस्त (Cyber Dost) कडून अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि सांगण्यात आले आहे की, कशा प्रकारे सायबर गुन्हेगारांपासून बचाव करता येऊ शकतो.

काय आहे अलर्ट?
Cyber Dost च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर माहिती शेयर करण्यात आली आहे.
यामध्ये म्हटले आहे की, तुमच्या ईमेल किंवा मेसेजिंग अ‍ॅपवर पाठवलेल्या बनावट जॉब अपॉईंटमेंट लेटरपासून सावध रहा.
सायबर गुन्हेगार रजिस्ट्रेशन किंवा इंटरव्ह्यू चार्जच्या नावावर तुमची फसवणूक करू शकतात.

काही गुन्हेगार नोकरीच्या संधीसाठी सरकार आणि कॉर्पोरेट संघटनांच्या नावाचा दुरुपयोग करत आहेत. नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी या वेबसाइटची प्रामाणिकता पडताळून पहा.

जर तुम्हाला वाटत असेल की काहीतरी चुकीचे होत आहे तर तुम्ही यासंबंधीची तक्रार सायबर दोस्तची अधिकृत वेबसाइट www.cybercrime.gov.in वर जाऊन करू शकता.

UPI फ्रॉडबाबत केले सावध
यासोबतच, सायबर दोस्तने युपीआय (UPI) फ्रॉडबाबत लोकांना सावध केले आहे. सरकारने म्हटले की, आपला युपीआय पिन इतर कुणाशीही सामायिक करू नका. आपला युपीआय पिन गुप्त ठेवा. फ्रॉड आकर्षक जाहिरात ऑफरवर क्लिक करू नका जे तुमचा युपीआय पिन मागतात आणि तुमच्या युपीआय खात्यातून पैसे कापण्याचा प्रयत्न करतात.

हे देखील वाचा

 

PM-Kisan | 10.34 कोटी शेतकर्‍यांना मिळाला पीएम किसानच्या आठव्या हप्त्याचा लाभ, लवकर करा रजिस्ट्रेशन

 

Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार घरबसल्या देत आहे 2 लाख रुपये; केवळ 30 जूनपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Fake Job | cyber dost beware of fake job appointment letters sent on your email or messaging app

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update