फेक जॉब पोर्टल्सने एक महीन्यात 27 हजार लोकांना ‘मूर्ख बनवून लुबाडले 1.09 कोटी रुपये

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी एका अशा टोळीला पकडले आहे, जी तरूणांना केंद्र सरकारी नोकरीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुबाडत होती. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुरूवारी पाच संशयितांना पकडले आहे. हे नोकरीचे रॅकेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नावावर चालवले जात होते आणि महिन्याच्या आत नोंदणी शुल्काच्या नावाखाली लोकांकडून 1.09 कोटी रूपये लुबाडले होते. या पोर्टलने 27,000 अर्जदारांना फसवले आहे. पीडितांची संख्या पहाता पोलिसांनी म्हटले की, ही आतापर्यंत झालेली सर्वात मोठी फसवणूक आहे.

पोलिसांनी म्हटले की, सरकारी आणि खासगी एजन्सीसाठी ऑनलाइन भरती आयोजित करणार्‍या मास्टरमाईंड पोर्टलने कायदेशीररित्या एक सेंटर सुरू केले होते, यासाठी त्यांच्याकडे नोकरी हवी असलेल्यांचा वैयक्तिक डेटासुद्धा पोहचत होता, ज्यांना त्यांनी नोकरीचे अमिष दाखवण्यासाठी मॅसेज पाठवले होते. एका महिन्यात, टोळीने कथित प्रकारे 13,000 व्हॅकन्सीसाठी नोंदणी करण्यासाठी फसवणूक करण्यासाठीच्या वेबसाइटच्या लिंकसह 15 लाख एसएमएस पाठवले, ज्यामध्ये अकाऊंटंट, डेटा एंट्री ऑपरेटर, नर्सिंग, आया आणि अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरसारख्या पदांचा समावेश होता.

सायबर सेलचे पोलीस उपायुक्त, अनीश रॉय यांनी या बनावट नोकर्‍यांबबात म्हटले की, या वेबसाइट इतक्या हुबेहुब डिझाइन केल्या होत्या की काही वृत्त आणि नोकरी पोर्टल्सचे म्हणणे होते की, त्या खर्‍या आहेत. रॉय यांनी म्हटले की, लोकांना गंडा घालण्यासाठी टोळी दोन वेबसाइट चालवत होती – www.sajks.org आणि www.sajks.com. दोन्हींचा दावा होता की, त्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत आहेत.

एसएजेकेएसचा अर्थ आरोग्य आणि जन कल्याण संस्था. जेव्हा आम्ही दोन्ही वेबसाइटपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजले की, दोन्हीपैकी एकही साइट सध्या काम करत नाही. हा गुन्हा मागील महिन्यात समोर आला होता, जेव्हा एका अर्जदाराने तक्रार केली की त्याच्याकडून रजिस्ट्रेशन फि म्हणून 500 रुपये घेतले गेले आणि त्यानंतर त्याच्याशी कसलाही संपर्क साधण्यात आला नाही. रॉय यांनी म्हटले की, नोंदणी शुल्क केवळ 100 आणि 500 रुपयांच्या दरम्यान असल्याने पीडित पोलिसांशी संपर्क साधणार नाहीत, असे आरोपींना वाटले होते.

पोलिसांनी एक प्रकरण दाखल केले आहे आणि संशयितांची माहिती गोळा करण्यास सुरूवात केली आहे. तपासात समजले की, हरियाणाच्या हिसार जिल्ह्यात बनावट वेबसाइटच्या नावाने एक बँक खाते उघडण्यात आले होते. पोलीस आयुक्तांनी सांगितले की, लवकरच आम्हाला समजले की, नोकरीसाठी उमेदवारांनी भरलेले पैसे या खात्यात जमा होत होते, आणि दररोज एटीएमने काढले जात होते. मंगळवारी आम्ही हिसारमध्ये अशाच एका एटीएममध्ये सापळा रचला आणि एका संशयिताला रंगेहात पकडले जो पैसे काढत होता.

अधिकार्‍याने सांगितले की, 27 वर्षीय अमनदीप खेत्री नावाच्या या संशयित माणसाचे काम केवळ रोज पैसे काढणे आणि टोळीच्या सदस्यांना वितरित करण्याचे होते. याच्याशिवाय आणखी चार लोकांना अटक केली आहे. पकड्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये दोन वेबसाइट डिझायनर संदीप आणि जोगिंदर सिंह, बँक खातेधारक सुरेंद्र सिंह आणि मास्टरमाईंडचा समावेश आहे.