‘या’ बहाद्दरानं स्वतःच्याच अपहरणाच केलं ‘नाटक’, ‘WhatsApp’ वरून फोटो पाठवल्यानंतर पत्नीला मागितली ‘खंडणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमधील एका व्यक्तीने स्वतःच्याच अपहरणाचा कट रचल्याचे उघड झाले आहे. 11 दिवस त्याने पोलिसांना, घरातील व्यक्तींना फसवले असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला जयपूरमधील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले असून त्याच्याकडे तपास केला असता त्याने सर्व माहिती सांगितली.

मनोज कुमार असे या व्यक्तीचे नाव असून त्याची पत्नी भारती चौधरी हिने पोलिसांना सांगितले कि,10 ऑक्टोबरपासून तिचा पती बेपत्ता असून काही सामान आणण्यासाठी बाजारात गेल्यानंतर तो परत आला नाही. त्यानंतर तक्रारीवरून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. त्याचदरम्यान त्याने आपल्या पत्नीच्या मोबाईलवर अपहरणाचे फोटो पाठवले. यामध्ये त्याचे तोंड बांधलेलं दिसून येत होते. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला फोन करून आपले अपहरण झाल्याचे सांगितले.

तसेच अपहरणकर्ते हे चार लाख रुपये मागत असल्याचे त्याने तिला सांगितले. त्यामुळे पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाला वेग दिला. मात्र यादरम्यान अपहरण झालेला व्यक्ती हा आपल्या व्हाट्सअ‍ॅपवरून अनेकांना मॅसेज पाठवत असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर तो राजस्थानमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकत त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, पोलिसांच्या तपासात त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर दीड लाख रुपयांचे कर्ज असल्याने त्याने हा अपहरणाचा कट रचला. त्यामुळे हा डाव रचत त्याने आपल्या पत्नीकडून चार लाख रुपये मिळवण्यासाठी हा कट रचत पत्नी आणि नातेवाईकांना भ्रमित केले. क्राईम पेट्रोल हि मालिका पाहून त्याने हा कट रचला होता.

Visit  :Policenama.com