Fake Milk Test | तुम्ही भेसळयुक्त दूध, तूप किंवा पनीर खरेदी करत आहात का?, एक मिनिटात ‘या’ पध्दतीनं तपासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Fake Milk Test | दूध आणि त्यापासून तयार उत्पादने जसे की, तूप, पनीर, खवा इत्यादी आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. परंतु सध्या काही नफेखोर लोक नफा वाढवण्यासाठी डेयरी दूध आणि त्यापासून तयार उत्पदानांमध्ये भेसळ करू लागले (Fake Milk Test) आहेत. भेसळयुक्त दूध आणि पनीर इत्यादीचे सेवन केल्याने आरोग्याला मिळणारे लाभ कमी होतात, तसेच नुकसानही होते.

परंतु तुम्ही भेसळयुक्त दूध, पनीर आणि तूप ओळखू शकता. ते सुद्धा घरबसल्या. ही भेसळ कशी ओळखावी ते जाणून घेवूयात…

 

दूधातील पाणी कसे ओळखावे (water in milk test)

FSSAI नुसार, बनावट आणि शुद्ध दूध ओळखण्यासाठी ही पद्धत अवलंबू शकता.

– सर्वप्रथम एका पॉलिश आणि उतार असलेल्या ठिकाणी दूधाचा एक थेंब टाका.

– दूध शुद्ध असेल तर ते थांबून राहील किंवा हळुहळु खाली जाईल आणि आपल्या पाठीमागे एक पांढरी निशाणी सोडत जाईल.

– जर दुधात पाणी मिसळले असेल तर ते कोणतीही निशाणी मागे न ठेवता वेगाने खाली जाईल.

 

दूधात डिटर्जंट कसे ओळखला (fake or pure milk test)

– 5ml ते 10ml दूध घेऊन तेवढेच पाणी मिसळा.

– हे मिश्रण चांगले हलवा.

– जर दूधात डिटर्जंट असेल तर दूधात साबणाचा फेस येऊ लागेल.

– शुद्ध दूध हलवल्याने हलका फेस येईल.

 

दूध आणि त्याच्या उत्पादनांमध्ये (पनीर, खवा) स्टार्च कसे ओळखावे

– 5ml पाण्यासह 2-3ml सॅम्पल उकळवा.

– सॅम्पल थंड करून त्यामध्ये 2 ते 3 थेंब आयोडीन टिंक्चर टाका.

– जर मिश्रणात निळा रंग आला तर स्टार्च मिसळलेले आहे आणि जर रंग सफेदच राहिला तर पनीर, खवा शुद्ध आहे.

– दूधात स्टार्च ओळखण्यासाठी पाणी मिसळणे आणि उकळण्याची आवश्यकता नाही.

 

शुद्ध आणि बनावट तूप कसे ओळखावे (fake or pure ghee test)

– एक पारदर्शक भांड्यात अर्धा चमचा तूप किंवा लोणी टाका.

– आता यामध्ये 2 ते 3 थेंब आयोडिन टिंक्चर टाका.

– जर तूपात बीट, कुस्करलेला बटाटा किंवा इतर स्टार्च मिळसले तर त्याचा रंग निळा होतो.

Web Title : Fake Milk Test | fake or pure test of milk and milk products like paneer ghee butter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update