भाजपासाठी रणवीर-दीपिका करत आहेत प्रचार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी भाजपाचा प्रचार करत असल्याची चर्चा सुरु आहे. त्या दोघांचा एक फोटो सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत दोघांच्याही गळ्यात भगव्या रंगाचं उपरणं दिसत आहे. या उपरण्यावर Vote for Modi आणि Vote for BJP N Modi असं लिहिलेलं दिसत आहे.

हा फोटो फेसबुकवरील असून रणवीर आणि दीपिका भाजपासाठी मत मागत असल्याचा दावा या पोस्ट मध्ये करण्यात आला आहे. सैनी बीजेपी या पेजवरून दिनांक 12 एप्रिल रोजी हा फोटो पोस्ट करण्यात आल्याचे समजत आहे. हा फोटो पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव राघवेंद्र शुक्ला असून भारत माता की जय असं लिहून शुक्ला नावाच्या फेसबुक युजरने हा फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट टाकल्यानंतर, ही पोस्ट खूपच वेगाने शेअर होताना दिसून आली. तब्बल 3 हजार 600 हून अधिक लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. फक्त फेसबुकच नाही तर ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅपसह इतर सोशल मीडियावर ही पोस्ट वेगाने व्हायरल होताना दिसून आली.

काय आहे सत्य ?
रणवीर आणि दीपिकाच्या फोटोला एडिट करण्यात आलं आहे. मूळ फोटोत Vote for BJP असे काहीही लिहिण्यात आले नव्हते. हा फोटो काही महिन्यांपूर्वीच हटवण्यात आला आहे. विवाहबद्ध झाल्यानंतर दीपवीर मुंबईत सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते. तेव्हा या दोघांनी भगवं उपरणं घातलं होतं. याच दीपवीरच्या फोटोला एडिट करत व्हायरल करण्यात आलं होतं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp chat