‘तो’ व्हायरल मॅसेज फेक : बँका सलग आठ दिवस बंद नाहीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

बँका पुढील आठवड्यात २ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर असे सलग आठ दिवस बंद राहणार असल्याचा मसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वांचीच धावपळ उडाली आहे. सर्वजण शुक्रवारीच बँकेचे व्यवहार पूर्ण करुन घ्यावेत असा सल्ला एकमेकांना देत आहेत. मात्र, हा मेसज चुकीचा असल्याचे आणि त्यामध्ये तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

[amazon_link asins=’B00PVUAJDW,B00JKGEERU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8476d730-ace1-11e8-9520-6b90caed10b7′]

२ सप्टेंबरला रविवार असल्याने बँका नेहमीप्रमाणे बंदच राहणार आहेत. ३ सप्टेंबरला दहीहंडी असली तरी बँका सुरु राहणार असून फक्त सरकारी कार्यलाये बंद असणार आहेत. ४ सप्टेंबर मंगळवार आणि ५ सप्टेंबरला बुधवारी रिझव्ह बँक ऑफ इंडियाचा संप असला तरी त्याचा परिणाम बँकांच्या कामकाजावर होणार नाही. मुंबई शहर आणि राज्यातील सर्व बँका सुरु राहणार आहेत.

६ सप्टेंबरला गुरुवारी आणि ७ सप्टेंबरला शुक्रवारीही बँका नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. ८ सप्टेंबरला शनिवार आणि ९ सप्टेंबरला रविवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेला मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डॉल्बी लावणाऱ्यांवर कडक कारवाई होणार : अभिनव देशमुख