सावधान ! 31 डिसेंबरपासून 2 हजार रुपयांची नोट बंद होणार ? जाणून घ्या या बातमीचं ‘वास्तव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जर आपण हा संदेश वाचला असेल की ३१ डिसेंबर २०१९ पासून २ हजार रुपयांच्या नोटा बंद होणार आहेत तर जाणून घ्या प्रकरण नेमकं काय आहे. सध्या सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की ३१ डिसेंबर २०१९ पासून २ हजार रुपयांच्या नोटा बंद होणार आहेत. खरंतर या सर्व अफवा असून दोन हजारांच्या नोटा बंद होणार नसून १ हजार रुपयांची नोट देखील बाजारात येण्याचे काही चिन्ह नाहीत. नोटासंबंधी ज्या काही अफवा ऐकायला येत आहेत त्या निव्वळ खोट्या आहेत.

हा संदेश होत आहे व्हायरल
एका वापरकर्त्याने ट्वीट करून लिहिले की, “३१ डिसेंबर २०१९ नंतर २ हजार रुपयांच्या नोटा बदलल्या जाणार नाहीत.” या संदेशासह, वापरकर्त्याने एका न्यूज वेबसाइटची लिंक देखील त्यासोबत जोडली आहे.

हे आहे वृत्ताचे सत्य
या वृत्ताचा सविस्तर आढावा घेतल्यावर समोर आले की, कुठेच असे लिहिलेले आढळले नाही की सरकार २ हजार रुपयांची नोट बंद करणार आहे. खरंतर ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या या बातमीत असे लिहिले गेले होते की एसबीआय एटीएममधून लोक दोन हजार रुपयांच्या नोटा काढू शकणार नाहीत, कारण एसबीआय हळूहळू एटीएम मशीनमध्ये मोठ्या नोटा ठेवणे थांबवणार आहे. त्याऐवजी ५००, १००, २०० रुपयांच्या नोटा वाढवल्या जातील.

अडथळे टाळण्यासाठी २ हजार रुपयांच्या नोटांचे मुद्रण थांबवले
अधिक माहिती म्हणजे आरबीआयच्या अधिसूचना विभागात असे काहीही उघड झाले नाही. तसेच २ हजार रुपयांची नोट एक कायदेशीर निविदा आहे आणि ती बंद करण्याबद्दल ज्या गोष्टी पसरविल्या जात आहेत त्या केवळ अफवा आहेत. ऑक्टोबरमध्ये एका आरटीआयला उत्तर देताना हे उघड झाले होते की आरबीआयने २ हजार रुपयांच्या नोटांचे मुद्रण बंद केले आहे. परंतु माध्यमांच्या वृत्तानुसार, काही अडथळ्यांना थांबविण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले होते.

Visit : Policenama.com