सावधान ! घर भाडयाच्या ‘बोगस’ पावत्या देणार्‍यांवर कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर भरताना कर वाचवण्याच्या प्रयत्नात तुम्ही राहत असलेल्या घराचे घरभाडे खोटे किंवा आधिक दाखवले तर ते तुम्हाला महागात पडू शकतात. कारण असे केल्यास आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकते. आता आयकर विभाग अशा प्रकारांना लगाम लावण्याचा प्रयत्न करणार आहे. असे प्रकार घडल्यास आयकर विभाग कठोर पाऊल उचलू शकते.

नवा आयटीआर फॉर्म

आयकर विभागाने आयटीआर फाॅर्म आणि संशोधित फॉर्म १६ अशा प्रकारे रचना केली आहे. ज्यात खोटे किंवा चूकीचे कागदपत्रे दाखल केल्यास कंप्युटर आधारित प्रक्रियेने याची तपासणी करण्यात येईल. जर कोणत्याही माहितीची जूळणी झाली नाही तर याची तपासणी करुन आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकते.

नवीन फॉर्म १६ मधून आयकर विभाग इलेक्ट्रॉनिक मॅचिंगच्या माध्यमातून फॉर्ममध्ये भरण्यात आलेली माहितीची जुळवणी करील. फॉर्म मध्ये भरलेली माहिती स्त्रोतांशी जुळवली जाईल. नव्या आयटीआर फॉर्म मध्ये एक ड्रॉप डाऊन कॉलम देण्यात आला आहे. ज्यात करदात्यांच्या आतिरिक्त भत्यांची माहिती भरण्यात येते. यात एचआरए, एलटीए, पेंशन लीव सॅलरी यांचा समावेश करण्यात आला आहे. अनेकदा पाहिले जाते की घर असताना देखील एचआरए मध्ये हि माहिती दाखल करण्यात येते. तसेच १ लाख पेक्षा अधिक वार्षिक भाडे असल्यास घर मालकाचे पॅनची माहिती देण्याची गरज नाही. करदाता यांचा फायदा घेतात.

 

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

सुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा

 ‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’