बनावट शिक्क्यांचे रॅकेट उघड, तिघांना अटक

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  बनावट शिक्क्यांचे रॅकेट पोलीसांच्या हाती लागले असून विमा कंपन्यांना गंडा घालणारे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कळंब पोलीसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. किरण सिध्देश्वर ठेंगल (वय 27, रा. रमाई नगर मुरुड) विजय उर्फ धिरज अमर गायकवाड (वय 23, रा. तुळजापूर), कबिर धुळा वाघमारे (वय 45, रा. ईरला ता. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शनिवारी रात्री 9.15 वाजता पेट्रोलिंग करत असताना कळंब पोलीसांना संशय आल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांना अडवले. त्यांच्या गाडीच्या डीगीत आर.टी.ओ लातूर, आर.टी.ओ उस्मानाबाद, तहसीलदार कळंब, सेतु सुविधा केंद्र तहसील कार्यालय लातूर, अभिजीत मांजरे (डेप्युटी आर.टी.ओ उस्मानाबाद), मुख्याधिकारी कळंब, उपप्रादेशिक परीवहन अधिकारी अंबेजोगाई, यांच्या कार्यालयाचे गोल व आडवे असे एकूण 26 रबरी शिके आढळून आले आहे. तसेच या सोबत स्टॅम्प पॅड, दोन कोरे आरसीबुक, दहा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, 15000 रूपये किमतीचा लॅपटॉप. किरण याचे दोन वेगवेगळ्या नंबरचे आधार कार्ड, तसेच किरण ठेंगल नावे असलेले व चेकवर विजय चंद्रकांत काळदाते यांची सही असलेले कॅनरा बॅकेचे चेक आढळून आले आहेत. या कारवाईत एकून 75 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस नाईक सुनील लिंबराज हांगे यांनी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या आरोपींविरूध्द 467, 468, 472, 473, 34 भादवि सह कलम 3(1)/181, 158/177, 184 नुसार फिर्याद दिली आहेत. ही कारवाई कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, पोलीस नाईक सुनील हांगे, पोलीस हवालदार सुनील कोळेकर, कोरे रविशंकर, शेख मिनाज, गिराम यांनी केली. पुढील तपास पोलीस नाईक सुनील कोळेकर करत आहेत.

विमा कंपन्यांना गंडा घालणारे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. वाहनासहित सर्व कागदपत्रे डुप्लिकेट करून विमा कंपन्यांना गंडा घालणारे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अशाच प्रकारचे रॅकेट लातूर, उस्मानाबाद व बीड मध्ये सक्रिय असण्याची शक्यता आहे. मात्र या कारवाईने त्यांचे धाबे दणाणले आहे. कळंब पोलीसांचे कौतुक होत आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like