दिल्लीत टाटा मीठाच्या बनावट कारखान्याचा पर्दाफाश, 3000 किलो भेसळयुक्त मीठ जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्ली येथे बनावट टाटा मीठाच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या कारखान्यावर छापा टाकून टाटा कंपनीच्या नावाने विक्री होत असलेले मीठ जप्त केले. पोलिसांनी या कारवाईत तब्बल 3 हजार किलोपेक्षा अधिक बनावटी मीठ जप्त केले असून या प्रकरणी एका दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधीत दुकानदारावर कॉपी राईट गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली पोलिसांनी प्रल्हादपूर येथील बांगर परिसरात बनावटी कंपनीच्या मिठाचे उत्पादन करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता कारखान्यामध्ये प्रसिद्ध टाटा कंपनीच्या बनावटी मीठाचा साठा आढळून आला. पोलिसांनी तीन हजार पेक्षा अधिक किलो बनावट मीठ जप्त केले आहे.

दरम्यान, देशातील बऱ्याच भागांमध्ये प्रसिद्ध कंपन्यांचे बनावट उत्पादन बनविण्याऱ्या कंपन्या नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या बातम्या येत असतात. जानेवारीत दिल्लीच्या जिंदपूर भागात अशाच प्रकारे एका कारख्यान्याचा पर्दाफाश करण्यात आला होता. येथून टाटा सॉल्ट, सर्फ एक्सेल आणि टाईड वॉशिंग पावडरचे बनावट रॅपर जप्त करण्यात आले होते. येथे तयार करण्यात आलेले मीठ, बनावट वॉशिंग पावडर जप्त करण्यात आले होते. याची दिल्ली आणि परसिसात मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आल्याचे समोर आले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like