पिस्तुलाचा धाक दाखवत जबरी चोरीचा बनाव, 33.50 लाख 12 तासात जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – कर्ज फेडण्याकरीता व मौजमजा करण्याकरीता पैश्यांची गरज असल्याने पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरी झाल्याचा केलेला बनाव गुन्हे शाखा युनिट पाचने उघडकीस आणला. पैसे गोळा करुन बँकेत जमा करण्याची जबाबदारी असणाऱ्या कंपनीतील कामगाराने मित्राच्या मदतीने हा प्रकार केला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 12 तासाच्या आतमध्ये दोघांना अटक करुन 33 लाख 30 हजार 464 रुपये जप्त केले.

लॉजीकॅश कंपनीमध्ये काम करणारा कुणाल रविंद्र पवार याने भोसरी, दिघी, नाशिक फाटा, पिंपळे सौदागर, पिंपरी, चिंचवड, देहुगाव व देहुरोड येथून कंपनीची कॅश गोळा करुन तो ताथवडे येथे जात होता. त्यावेळी एक काळे रंगाचे पल्सरवर अंगामध्ये निळे रंगाचा जॅकेट घातलेला एक अज्ञात व्यक्तीने पिस्तुलाचा धाक दाखवून त्याचेकडे जमा झालेली 33,30,464 रूपये जबरीने घेवून निघून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
LCB

pimpari-police1
या गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर व त्यांचे पथक करत होते. तपास करताना कुणाल हा सांगत असलेली गुन्ह्याची हकिकत यामध्ये तफावत आढळुन आली. तसेच मोबाईल मधील मेसेज डिलीट केल्याचे पोलीस उपनिरीक्षक बोडखे व पोलीस शिपाई मयुर वाडकर यांना लक्षात आल्याने त्यांनी तांत्रिक विश्लेषण करुन त्याचे संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहिती घेतली असता त्याचा मित्र ओंकार हा घटना घडली तेव्हा देहुरोड येथे आला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याच्यावर संशय अधिक बळावला. सखोल चौकशी केली असता कुणाल रविंद्र पवार याने त्याचा मित्र ओंकार उर्फ मोन्या बाळासाहेब भोगाडे याचेसह गेल्या आठ दिवसांपासुन कट रचुन कर्ज फेडण्याकरीता व मौजमजा करण्याकरीता पैसे हवे असल्याने खोट्या लुटीचा बनाव केला असल्याचे समोर आले.

ओंकार उर्फ मोन्या याचे घराजवळ पोलीस शोध घेत असताना पोलीसांचा सुगावा लागताच तो रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून पल्सर गाडी घेवून पळ काढू लागला. दोघांकडून लुटीच्या 33,30,464 रक्कमेपैकी 33,24,463 रुपये रक्कम, गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली काळ्या रंगाची पल्सर मोटार सायकल (एम.एच.14 एफ.क्यु 2494), हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल (एम.एच. 14 एफ.झेड. 5381) व 3 मोबाईल असा एकुण 34,39,463 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त सुधिर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, देहूरोडचे निरीक्षक मनिष कल्याणकर, सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक बोडखे, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, मयुर वाडकर, फारुक मुल्ला, संदिप ठाकरे, स्वामीनाथ जाधव, ज्ञानेश्वर गाडेकर, दत्तात्रय बनसुडे, भरत माने, राजकुमार इघार, दयानंद भोसले, दयानंद खेडकर, राजेश कुरणे व श्यामसुंदर गुट्टे यांनी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –