मुंबईतील बनावट लसीकरण प्रकरणातील आरोपीला बारामतीतून अटक; कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील कर्मचारी

पुणे न्युज (Pune news) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama) – भेसळयुक्त द्रव कोव्हिड १९ ची लस असल्याचे भासवून मुंबईत बनावट लसीकरण (Fake Vaccination) करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे. राजेश दयाशंकर पांडे असे या आरोपीचे नाव आहे. बारामती – भिगवण रोडवरील अमृता लॉजमधून बुधवारी रात्री त्याला ताब्यात घेण्यात आले. पांडे याच्याबरोबरच या बनावट लस (Fake Vaccination) प्रकरणातील सहभागी आरोपी डॉ. मनीष त्रिपाठी याला पोलिसांनी अटक केली होती.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

राजेश पांडे हा नामांकित कोकीलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून नोकरीला होता. त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून भेसळयुक्त द्रव कोव्हिड १९ ची लस असल्याचे भासवून सोसायटीच्या लोकांसाठी कॅम्प आयोजित केले होते. सिल तुटलेल्या व्हॅक्सिन बाटल्यामधून भेसळयुक्त लस देऊन त्यांनी लोकांची फसवणूक केली. लसीकरण केलेल्या लोकांना मुंबईतील वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दिले. लस घेतलेल्या नागरिकांपैकी कोणालाच काहीही त्रास झाला नाही. त्यामुळे लोकांनी चौकशी केली. तेव्हा त्यांना दिलेले लसीकरण प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी पांडे व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करुन काही जणांना अटक केली. पांडे हा फरार झाला होता.

राजेश पांडे हा पुणे शहर परिसरात आल्याची माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंके यांनी ग्रामीण पोलिसांना दिली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावंकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद पालवे, पोलीस अंमलदार नवनाथ शेंडगे व सचिन कोकणे यांनी अमृता लॉजवर छापा घालून राजेश पांडे याला अटक केली आहे. कांदिवलीतील हिरानंदानी हेरीटेज सोसायटीमध्ये ३० मे, २०२१ रोजी हे लसीकरण करण्यात आले होते. ज्यात ३९९ जणांना ही लस दिल्याचे उघड झाले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Fake Vaccination | Accused arrested in Baramati in fake vaccination case in Mumbai; Kokilaben Dhirubhai Ambani Hospital staff

हे देखील वाचा

Pune Crime News | उच्चशिक्षीत विवाहीतेचा छळ ! पुण्यातील बड्या उद्योजक कुटुंबातील तिघांसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल; पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे झाला बहिरा

Maharashtra Monsoon | बळीराजांवर अस्मानी संकट ! राज्यात पुढील 10 दिवस पावसाची दांडी, हवामान खात्याचा अंदाज

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्या कारवर सोलापूरमध्ये दगडफेक, गोळ्या मारल्यातरी गप्प बसणार नाही, पडळकरांची प्रतिक्रिया

7th Pay Commission | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! 7 वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता ‘या’ महिन्यात मिळणार