Fake Vaccines | ‘कोविशील्ड’-‘कोव्हॅक्सीन’ किंवा ‘स्पुतनिक-व्ही’ ! तुम्हाला दिली जात असलेली व्हॅक्सीन बनावट तर नाही ना? केंद्राने सांगितले कसे ओळखावे

नवी दिल्ली : Fake Vaccines | कोरोनाविरूद्ध लसीकरण जगभरात वेगाने सुरू असतानाच जगभरात बनावट कोरोना व्हॅक्सीनने चिंता वाढवली आहे. काही दिवसापूर्वीच आशिया आणि आफ्रीकेत बनावट कोविशील्ड आढळली होती. यानंतर आरोग्य संघटनेने बनावट व्हॅक्सीनबाबत (Fake Vaccines) सावध केले होते. आता केंद्र सरकारने राज्यांना अशा मानकांबाबत सांगितले, ज्याद्वारे समजू शकते की, तुम्हाला दिली जात असलेली व्हॅक्सीन बनावट आहे की खरी आहे.

केंद्र सरकारने याबाबत सर्व राज्यांना शनिवारी पत्र लिहिले आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या पत्रात राज्यांना कोव्हॅक्सीन, कोविशील्ड आणि स्पूतनिक-व्ही लससंबंधी प्रत्येक माहिती सांगण्यात आली आहे, ज्यावरून बनावट व्हॅक्सीनचा शोध घेता येईल.

कोविशील्ड

– SII च्या प्रॉडक्ट लेबलचा रंग गडद हिरवा असेल.

– ब्रँडचे नाव ट्रेड मार्कसह (COVISHIELD).

– जेनेरिक नावाचा टेक्स्ट फॉन्ट बोल्ड अक्षरात नसेल.

– यावर CGS NOT FOR SALE ओव्हरप्रिंट असेल.

कोव्हॅक्सीन

– लेबलवर इनव्हिजिबल म्हणजे अदृश्य UV हेलिक्स आहे, जे केवळ यूव्ही लाइटमध्ये दिसू शकते.

-लेबल क्लेम डॉट्सच्या मध्ये छोट्या अक्षरात लपलेले टेक्स्ट, ज्यामध्ये COVAXIN लिहिले आहे.

-कोव्हॅक्सिनमध्ये ’X’ दोन रंगामध्ये आहे, यास ग्रीन फॉयल इफेक्ट म्हणतात.

स्पूतनिक-व्ही

– स्पूतनिक-व्ही व्हॅक्सीन रशियाच्या दोन वेगळ्या प्लांटमधून आयात केली जात असल्याने तिचे दोन लेबल वेगवेगळे आहेत. मात्र सर्व माहिती आणि डिझाईन एकसारखीच आहे, केवळ मॅन्युफॅक्चररचे नाव वेगळे आहे.

– आतापर्यंत जेवढ्या व्हॅक्सीन आयात केल्या आहेत, त्यांच्यापैकी केवळ 5 एमपूलच्या पॅकेटवरच इंग्लिशमध्ये लेबर लिहिले आहे. याशिवाय उर्वरित पॅकेटवर हे रशियन भाषेत आहे.

हे देखील वाचा

Chakan Crime | चाकण पोलिसांचा ‘व्हिडिओ गेम’ जुगार अड्ड्यावर छापा, 7 जणांवर FIR

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Fake Vaccines | covishield covaxin and sputnik v centre tells states how to identify fake vaccines

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update