काय सांगता … ! रात्री ११.३० ते सकाळी ६ पर्यंत व्हॉट्सअॅप बंद राहणार? 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन 
हल्ली व्हॉट्सअॅपशिवाय अनेकांचे पानही हालत नाही. व्हॉट्सअॅपच्या वेडाने अनेकांची झोप उडवली आहे. अशातच आता  व्हॉट्सअॅपप्रेमींसाठी एक विशेष संदेश  सध्या व्हायरल होत आहे.  “रात्री ११.३० ते सकाळी ६.०० पर्यंत व्हॉट्सअॅप बंद राहणार असा हा संदेश आहे. इतकेच नव्हे तर हा संदेश केंद्र सरकारच्या  हवाल्याने व्हायरल होत आहे. या व्हायरल संदेशामुळे नेटक-यांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. मात्र, हा मेसेज फेक असल्याचे  समोर आले आहे.
 [amazon_link asins=’B00Y6EHHQ6,B071ZP46F8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e19a49c7-a494-11e8-8128-8112533dc808′]
असा आहे संदेश
रात्री ११.३० ते सकाळी ६.०० पर्यंत व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. तुम्ही हा मेसेज १० जणांना फोरवर्ड केला नाही तर तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट ४८ तासांत बंद करण्यात येईल. तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट बंद झाल्यानंतर ते पुन्हा चालू करण्यासाठी तुमच्याकडून ४९९ रुपयांचा दंड अकारण्यात येईल, असा मेसेज गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या मोबाइलवर फिरत आहे.
२०१६मध्ये ही अशाच आशयाचा एक मेसेज व्हायरल झाला होता. त्यावेळी त्या मेसेजमध्ये केंद्र सरकारच्या जागी व्हॉट्सअॅपच्या सीईओचे  नाव होते . अर्थात, ते नावही चुकीच  होते . त्यावेळी व्हॉट्सअॅप सीईओ जॉन कुम हे होते. पण मेसेज सीईओ आरोही देशमुख नावाने फिरत होता. त्यावरूनच त्यावेळी खोटेपणा  पकडला गेला होता . नवा मेसेजही फेक असल्याचं तज्ज्ञांचे  म्हणणे  आहे. सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची बंधन घालण्याचा विचार नसल्याचे  सरकारने  याआधीच स्पष्ट केले  आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.