10 बोगस जामिनदार ‘गोत्यात’, बनावट कागदपत्रांव्दारे मिळवून दिला अनेकांना ‘बेल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आरोपींच्या जामिनासाठी न्यायालयात बोगस जामीनदार उभा करुन थेट न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. या टोळीतील 10 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून खोटे आधार कार्ड, रेशन कार्ड, सातबारा जप्त करण्यात आले आहे. ही टोळी बनावट कागदपत्र तयार करून जामीनदारांना न्यायालयात उभे करून ते खरे असल्याचे भासवून न्यायालयाची फसवणूक करीत होते. यामध्ये काही वकिलांचाही सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुनम बाळु कांबळे (वय २७, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव), तैहसिन अर्शद जहागिरदार (वय ३८, रा. साईकृपा सोसायटी, चिखली), मन्सूर मोहमंद नायकवडी (वय ३०, रा. गणेशनगर, तळवडे, निगडी), सागर मुकुंद गायकवाड (वय २८, रा.अंकुश आनंद सोसायटी, निगडी), संतोष रघुनाथ अहिवळे (वय ३४, रा. पिंपरी), संजय साहेबराव ढावरे (वय ५०, रा. दळवीनगर, निगडी), देवानंद गोपाळराव गुट्टे (वय २८, रा. ता. गंगाखेड, जि. परभणी), सुनिल मारुती गायकवाड (वय ४०, रा. मोरवाडी, पिंपरी), विजय मारुती भारसकर (वय ४०, रा. मोरवाडी, पिंपरी), अविनाश भानुदास बनसोडे (वय २८, रा. चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शासकीय कार्यालयात बनावट कागदपत्रांचा वापर होत आहे, अशी बनावट कागदपत्रे बनविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून खंडणी व अंमली विरोधी पथकाला देण्यात आले होते. त्या अनुषंगाने तपास करत असताना काही व्यक्ती व महिला शिवाजीनगर न्यायालयात बनावट सात बारा उतारा, रेशन कार्ड, आधार कार्ड बनवून चोरी, घरफोडी या सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपांसाठी जामीन करण्यासाठी या कागदपत्राचा वापर करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शिवाजीनगर येथील कामगार पुतळा येथे छापा टाकून 10 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १३ आधार कार्ड व १५ रेशन कार्ड जप्त करण्यात आली आहेत.

असे करत होते गुन्हा
टोळीतील काही जण आरोपीच्या नातेवाईकांशी संपर्क करत होते. त्यांना आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी मदत करतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन खोटे आधार कार्ड, रेशन कार्ड, सातबारा तयार करुन घेत. त्यानंतर या जामीनदारांना न्यायालयात उभे करुन ते खरे असल्याचे भासवून न्यायालयाची फसवणूक करीत असत. यामध्ये प्रामुख्याने जो जामीनदार असे त्याच्या आधार कार्डावर फोटो असायचा. बाकी नाव, पत्ता हे बनावट टाकून त्यानंतर त्याच नावाने रेशन कार्ड तयार करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, किशोर तनपुरे, कर्मचारी अविनाश मराठे, भाऊसाहेब कोंढरे, प्रसाद मोकाशी, रमेश गरुड, पांडुरंग वांजळे, प्रमोद मगर, हनुमंत गायकवाड, सुनिल चिखले, विजय गुरव, उदय काळभोर, महेश कदम, मनोज शिंदे, सचिन कोकरे, मंगेश पवार, अमोल पिलाने, संदीप साबळे, प्रविण पडवळ, नारायण बनकर, रुपाली कर्णवर यांनी केली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

You might also like