महत्वाच्या झूम मिटिंगदरम्यान लावली खोटी हजेरी, व्हिडिओ व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे कार्यालयीन बैठकांवर निर्बंध आल्यामुळे बैठका आता झूमसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर घेण्यात येत आहेत. मात्र, अशा महत्वाच्या ऑनलाइन बैठकांमध्ये काहीजण खोटेपणा करीत असल्याचे उघडकीस आले आहे. मेक्सिकोतील संसदेच्या एका महत्वाच्या बैठकीत एका महिला पुढार्‍याने चक्क खोटी हजेरी लावली. हा प्रकार सर्वांसमोर बैठकीदरम्यानच उघडही झाला. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

व्हॅलेंटायना बेट्रेस गुआडर्मा या महिला नेत्याचा झूम मिटिंगमधला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हॅलेंटायना यांनी मेक्सिकोच्या पार्लमेंटच्या एका महत्वाच्या राजकीय ऑनलाइन बैठकीला हजेरी लावली होती. मात्र, बर्‍याच काळापासून त्यांची स्क्रिनवर हालचाल दिसत नव्हती. खरतरं त्यांनी मिटिंगदरम्यान हजर असल्याचे दाखवण्यासाठी लॅपटॉपच्या कॅमेरॅसमोर स्वतःचा फोटो लावला होता. झूम मिटिंग सुरु असताना काही वेळानंतर व्हॅलेंटायना जागा सोडताना दिसत आहेत. यावेळी मागे त्यांनी स्वतःचा फोटो लावल्याचेही स्पष्ट दिसत आहे. महत्वाच्या बैठकीत अशा प्रकारे खोटी हजेरी लावण्याच्या प्रकारामुळे त्यांच्या सहकार्‍यांसाठी ही मोठी शऱमेची बाब ठरली आहे. डेमोक्रेटिक रिव्होल्युशन पार्टीचे उपाध्यक्ष जॉर्ज गॅविनो यांनी ही संपूर्ण झूम मिटिंग रेकॉर्ड करुन ती ट्विटरवरुन शेअर केली आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यापासून त्याला 63,000 पेक्षा अधिक व्ह्यूव्ज मिळाले आहे. तर 300 युजर्सनी रिट्विट केला आहे. मात्र, आपल्यावरील हे आरोप व्हॅलेंटायना यांनी फेटाळून लावले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like