परदेशातील नागरिकत्व मिळवून देतो सांगून फसवणूक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – कॅनडा देशातील वर्क परमिट व पर्मनंट रहिवासी काढून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची आठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी साधना हरीसराय सिंग (३२ , रा. इंद्रायणी नगर भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. तर जतीन नरेंद्र सिंग ठाकूर (३४ रा. नरेगाव पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडा मध्ये वर्क परमिट व पर्मनंट रहिवासी काढून देण्याच्या बहाण्याने महिलेची आठ लाखांची फसवणूक करण्यात आली. जानेवारी २०१९ ते ५ मे २०१९ या कालावधीत ही घडली. जतीन याने साधना यांचे कॅनडातील वर्क परमिट व पर्मनंट परमिट काढण्यासाठी स्वतः आठ लाख रुपये भरले. ते पैसे मानव गायधने याला द्यायचे आहेत असे सांगून साधना यांच्याकडून मानव आणि अन्य काही जणांच्या बँक खात्यावर पैसे घेतले. मात्र काम न करता फसवणूक केली. तपास भोसरी पोलीस करीत आहेत