पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ‘कोरोना’चे रुग्ण आल्याची खोटी माहिती देत अफवा पसरवल्याबद्दल पहिला FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनाच पुण्यातील काही प्रसिद्ध हॉटेलमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण असल्याची खोटी माहिती देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरेगाव पोलीस ठाण्यात अफवा पसरवल्याप्रकरणी पहिला गुन्हा पुण्यात दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी खुद्द पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर (वय 59) यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या देशभरात कोरोना विषाणूमूळे हाहाकार माजला आहे. त्यामुळे सर्व स्थरावर खबरदारी घेतली जात आहे. तर शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. सर्वसामान्य नागरिक यामुळे भीतीच्या छायेखाली आहे. त्यात याबाबत जगभरात अफवा पसरवल्या जात आहेत भारतात ही अफवा पसवरल्या जात आहेत.

भारतात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात महाराष्ट्रत सर्वाधिक रुग्ण आहेत.

खबरदारी म्हणून राज्य शासनाने शाळा, महाविद्यालय, जिम, मॉल, तसेच गर्दी होणारी ठिकाणे बंद केली आहेत. तर, वेगवेगळ्या पातळ्यांवर उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान राज्यात आपत्ती व्यवस्थापण कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनाच रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अनोळखी मोबाईलवरून काही मॅसेज आले. त्यात पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये कोरोना रुग्ण आहेत. तर काही ठिकाणच्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोना झाला आहे. तसेच काही परदेशातील नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली. याबाबत खात्री केली असता असा कुठलाच प्रकार समोर आला नाही. त्यावेळी ही अफवा असल्याचे समोर आले. त्यांनतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

भारतात थैमान घालणाऱ्या रोगाबाबत अफवा पसवरल्याप्रकरणी पुण्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.