Pimpri News | तरुणाविषयी खोटी माहिती सांगितल्याने लग्नासाठी ठेवले ‘झुलवत’; केली आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मुलाची संगत चांगली नाही, तो फालतू आहे, अशी दिशाभूल करणारी माहिती दोघांनी दिल्याने मुलीच्या वडिलाने लग्नाला होकार देण्यास झुलवत ठेवले. परिणामी तरुणाने आत्महत्या (Suicide) केली. तरुणाला आत्महत्ये (Suicide)स प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणेश विक्रम खराडे (वय ३२, रा. मारुंजी, ता. मुळशी), उमेश विक्रम खराडे (वय ३४, रा. मारुंजी, ता. मुळशी), तुकाराम खंडु उदमले (वय ५१, रा. चौढी, ता. जामखेडे, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लता पंजाब खराडे (वय ४७, रा. काळा खडक, वाकड, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचा मुलगा आणि तुकाराम यांची मुलगी यांचा विवाह ठरला होता. मात्र, गणेश व उमेश यांनी उदमले यांनी फिर्यादीच्या मुलाला त्यांची मुलगी देऊ नये, यासाठी तो मुलगा व्यसनी आहे. त्याची संगत चांगल्या मुलासोबत नाही़ तो फालतू आहे, असे सांगून उदमले यांची दिशाभूल केली. त्यांच्या मनात मुलाविषयी गैरसमज निर्माण केला. त्यामुळे उदमले यांनी त्याची खातरजमा न करता गणेश व उमेश यांच्या ऐकून लग्नाविषयी स्पष्ट होकार अथवा नकार दिला नाही.

फिर्यादी यांच्या मुलाला फक्त आशेवर झुलवत ठेवले. या प्रकारामुळे मानसिक तणावात आलेल्या फिर्यादी यांच्या मुलाने २४ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता येळवंडे वस्तीतील रॉयल हॉटेल येथे आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलवर ऑडिओ रेकॉर्डिंग केले. त्यात आरोपी व आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केला आहे. पोलीस तपासात हे रेकॉडिंग आढळून आले. त्यात मुलाच्या आत्महत्येला हे तिघे जबाबदार असल्याचे लक्षात आल्याने हिंजवडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा

आमची वाघाशी दुश्मनी कधीच नव्हती, दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान (व्हिडीओ)

Nashik Election | नाशिकचा पुढील महापौर शिवसेनेचा, मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 16,379 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 95.45% 

नेपाळमध्ये पतंजलीच्या कोरोनिल किटच्या विक्री आणि वितरणावर का लावला गेला प्रतिबंध?

‘बारिश क्या हुई मिट्टी की फितरत बदल गई…’ अमृता फडणवीसांचा शायरीतून शिवसेनेला टोला

Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरात आज 300 जण ‘कोरोना’मुक्त, 314 नवीन रुग्णांचे निदान

व्यापाऱ्यांना धमकावणाऱ्या व खंडणी मागणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करणार; पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या निवेदनानंतर पोलिसांकडून आश्वासन

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Title : false information about the young man commits suicide hinjewadi