सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! लग्नासाठी खोटे ‘वचन’ देणाऱ्या महिला-पुरुषांबद्धल सांगितल्या ‘या’ गोष्टी

पोलिसनामा ऑनलाईन – सुप्रीम कोर्टाने लग्नासाठी खोटे वाचन देणाऱ्यांसाठी निर्णय सुनावला आहे. कोर्टाने महत्वाची टिप्पणी देताना असे म्हंटले, लग्न करण्याबाबत खोटे वचन देणे चुकीचे आहे. मग ते पुरुष असो अथवा महिला. महिलेनेही खोटे वचन देऊ नये. लग्न करणार असे खोटे सांगून बलात्कार केल्याच्या आरोपावरून चाललेल्या खटल्यात हा कोर्टाने निर्णय सुनावला आहे.

महिलेने असा आरोप लावला की, आरोपी विनय प्रताप सिंह ने धोका देऊन तिची सहमती घेतली आणि मनालीच्या एका मंदिरामध्ये लग्न करून तिचा विनयभंग केला.

तिचा बलात्कार झाल्याचे मुलीने कोर्टमध्ये सांगितले. याचिकाकर्त्याच्या मतानुसार, त्याने मुलीच्या सहमतीने असे केल्याचे सांगितले. याचिकाकर्त्याच्या वकिलाने हे ही सांगितले कि दोघांचे लग्न झाले नाही. ते फक्त सोबत राहत होते.

आरोपीच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, महिलेने नात्यामध्ये वाद उत्पन्न झाल्यानंतर एफआयआर दाखल केला. त्याआधी तिने कधी या गोष्टीचा उल्लेख केला नव्हता. ज्या दिवसांत नात्यात फूट पडू लागली तेव्हा महिलेने असा आरोप केला. आरोपीच्या मतानुसार, दोघे २ वर्षांपासून संबंधात होते. परंतू २०१९ मध्ये तिने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले. आरोपी महिलेसोबत राहत होता आणि तिला मारहाण करत होता. महिलेने मारल्याचे निशाण असलेले मेडिकल सर्टिफिकेट दाखवले.