योग गुरु रामदेव बाबांच्या अश्वगंधा घेण्याच्या सल्ल्याने भडकले डॉक्टर, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनी आणि तज्ज्ञांनी योग गुरु बाबा रामदेव यांच्या त्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. ज्यात ते म्हणाले होते की त्यांना कोरोनावर एक आयुर्वेदिक उपाय मिळाला आहे. या आठवड्यात आपल्या कंपनीकडून करण्यात आलेल्या एका प्रचाराच्या व्हिडिओमध्ये बाबा रामदेव म्हणाले होते, आम्ही वैज्ञानिक संशोधन केले आणि आम्हाला आढळले की अश्वगंधा कोरोना प्रोटीनला व्यक्तींमधील प्रोटिनमध्ये मिसळू देत नाही.

संशोधन आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये पाठवल्याचा दावा –
रामदेव बाबा यांनी या संशोधनासाठीचे कोणतेही पुरावे दिले नाहीत. त्यांनी नाव न घेता दावा केली की एका आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये संशोधन प्रकाशित करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. परंतु अद्याप कोविड – 19 वर कोणताही उपाय समोर आलेला नाही. फक्त काही औषधांवर संशोधन सुरु आहेत. जी विकसित केली जात आहे.

या प्रकारचे मेसेज लोकांना देत आहेत सुरक्षेचा खोटा विश्वास – डॉ. गिरिधारी बाबू
पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया महामारी विज्ञानचे प्रोफेसर डॉ. गिरिधारी बाबू यांनी अशा प्रचाराला बंद करण्याची मागणी केली. या प्रकारच्या मेसेज एक खोटा विश्वास देतात. जे लोक चांगल्या प्रकारे शिक्षित नाहीत ते अशा सूचनांनी लोकांना भ्रमित करतात. बाबू म्हणाले, येवढेच नाही तर प्रतिकार क्षमतेचा धोका नसल्याचे सांगणाऱ्या ट्विटमुळे लोक भ्रमित होत आहेत.

प्राचीन काळात भारतात उपयोगात आणली जात होती आयुर्वेदिक आरोग्य पद्धती –
पंतजली आणि रामदेव बाबा यांचे यावरील मत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु त्यांचे त्यावर उत्तर आले नाही. एका मागोमाग रामदेव बाबांनी भारतीय लोकांची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी योग करण्याचा सल्ला दिला. त्यांनी हे ट्विट #YogaForCorona असे हॅशटॅग वापरत केले होते.

आयुर्वेद एक प्राचीन आरोग्य प्रणाली आहे, जी हर्बल औषधांनी तयार केली जाते. ज्यात व्यायाम आणि जेवणाचा सल्ला देण्यात आला आहे. आयुर्वेदाचा लाखो भारतीय रोजच्या जीवनात उपयोग करतात.