घरगुती प्रदूषण सुद्धा तुम्हाला पाडू शकते आजारी, जाणून घ्या ‘हे’ 6 बचावाचे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेक मोठ्या शहरांमध्ये राहणार्‍या लोकांना प्रदूषण हा शब्द नवा नाही. दिल्ली-एनसीआरमध्ये तर दरवर्षी हिवाळ्यात धूर, डोळ्यांची जळजळ करणारी खराब एयर क्वालिटी इंडेक्सची समस्या असते. पण प्रदूषित हवा केवळ बाहेर आहे, आणि घरात तुम्ही सुरक्षित आहात, असे समजणे चुकीचे ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) 3.8 मिलियन लोक दरवर्षी घरगुती प्रदूषणामुळे गंभीर आजारांना बळी पडतात. परंतु, तुमच्या घरात प्रदूषण येते कुठून, हे आम्ही सांगणार आहोत…

1. खराब कुकिंग इंधन
डब्ल्यूएचओच्या रिपोर्टनुसार, 3 बिलियनपेक्षा जास्त लोक जेवण बनवण्यासाठी लाकूड, केरोसीनचा वापर करतात. तुम्ही विचार कराल की हे गावात होते, आमचा काय संबंध. जर तुम्ही गॅस वापरत असाल तर यास लिक्विड पेट्रोलियम गॅस म्हणतात, हा प्रदूषण पसरवत नाही. तरीसुद्धा तुमच्या सिलेंडरमधील गॅस पूर्णपणे शुद्ध नसतो, यामध्ये घाण असते. ही घाण जळाल्यानंतर सूक्ष्म पार्टिकलमध्ये बदलते आणि श्वासाद्वारे फुफ्फुसात जाऊन मोठे आजार निर्माण करते.

2. धूर
मॉस्कीटो कॉईल, सिगारेट, मेणबत्तीमधून सुद्धा धूर निघतो. हा धूर आरोग्यासाठी घातक असतो.

3. बुरशी
घरातील बुरशी, घाण, फंगससुद्धा आरोग्यासाठी घातक असते. बुरशी उगवत आहे हे अनेकदा समजत देखील नाही. ही तुमच्या किचन सिंकच्या पाईपमध्ये किंवा ड्रेनमध्ये, बाथरूमच्या टाइल्सच्या खाली, खिडक्यांच्या काठांवर आणि कारपेट व सोफ्यात उगवू शकते. यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

4. श्वास
तुम्ही जेव्हा श्वास घेता, तेव्हा कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. जर खोली बंद असेल किंवा व्हेंटिलेशन ठिक नसेल तर हा कार्बन डायऑक्साइड वातावरणातच राहातो. हवेत ऑक्सीजनचा स्तर कमी होतो आणि कार्बन डायऑक्साइड आपोआप कार्बन मोनोऑक्साइड बनवू लागतो, जो शरीरासाठी विषारी गॅस आहे.

बचावासाठी करा हे उपाय

1. घरात हवेचे योग्य व्हेंंटिलेशन असावे. एग्झॉस्ट फॅन लावा.

2. जेवण बनवताना किचनमध्ये व्हेंटिलेशन जरूरी आहे.

3. इंडस्ट्रियल एरिया किंवा मुख्य रस्त्याजवळ राहात असाल तर घरात एयर प्युरिफायर लावा.

4. घरात इनडोर वनस्पती लावा. मनी प्लँट, स्नेक प्लँट , तुलस घरात ठेवा.

5. जवळपास गार्डन असेल तर किमान अर्धातास गार्डनमध्ये जाऊन बसा.

6. घरात सिगारेट ओढू नका.