सेल्फी काढताना एकाच कुटुंबातील तिघे वाहून गेले

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन

बुलडाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीला पूर आला असताना शेगाव-संग्रामपूर मार्गावरील पुलावर सेल्फी काढताना तोल गेल्याने पती-पत्नी आणि त्यांचा १२ वर्षांचा मुलगा नदीत वाहून गेला.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1cdcd7b-a622-11e8-9447-bd4da445220d’]

बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे कर्मचारी राजेश गुलाबराव चव्हाण, त्यांची पत्नी व बारा वर्षांचा मुलगा हे वाहून गेले आहेत. पूर्णा नदी दुथडी वाहत असताना नदीवरील खिरोडा पुलावर उभे राहून ते सेल्फी घेत होते.

राजेश चव्हाण हे जळगाव जामोद येथील बुलडाणा अर्बन या पतसंस्थेत कार्यरत होते. आपल्या कुटुंबासह ते मोटरसायकलवरुन शेगावकडे येत होते. दरम्यान, खिरोडा नजीक रस्त्यामध्ये लागलेल्या पूर्णा नदीचे दुथडी भरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी ते पुलावर थांबले. त्यानंतर पाण्याजवळ जावून सेल्फी काढत होते पाण्याला वेग असल्याने त्यांचा तोल जाऊन ते पत्नी आणि मुलासह नदीत वाहून गेले. पोलिसांना या कुटुंबाची मोटरसायकल, चष्मा व चप्पल असे साहित्य येथे आढळून आले आहे.

पोलीस स्टेशन तांमगाव हद्दीत शेगाव ते वरवंट बकाल रोडवर असलेल्या खिरोडा पुलातील पूर्णा नदी पात्रात अंदाजे 17.00 राजेश गुलाबराव चव्हाण वय 42 वर्ष, त्याची पत्नी सरिता चव्हाण वय 39 वर्ष व मुलगा श्रावण चव्हाण वय 13 वर्षा असे फोटो काढत असताना मुलाचा पाय घसरल्याने मुलगा नदीत पडल्यामुळे त्याची आई ही त्याला पकडण्यासाठी गेली असता ते दोघेही वाहून जात होते त्यांना वाचवण्यासाठी राजेश चव्हाण याने नदीत उडी मारली असता ते तीन ही जण नदी पात्रात वाहून गेले.