‘कोरोना’मुळे घरातील कर्ता गमावला आता पत्नी व मुलाचाही ‘व्हायरस’शी लढा

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या दिल्लीतील पोलीस कॉन्स्टेबल अमित राणा यांची पत्नी आणि 3 वर्षांच्या चिमुरड्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. सोनीपत स्वास्थ विभागाने दोघांनाही आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले आहे. अमित राणा हे सोनीपत गावात हुलहेडीत राहत होते. ते दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल पदावर होते.

दिल्लीची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमित राणा यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली होती. त्यांनी जवानाच्या मृत्यूनंतर दु:ख व्यक्त केले होते. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन, अमित यांनी जीवाची पर्वा न करता कोरोना व्हायरसच्या संकटात दिल्लीकरांची सेवा करीत राहिले. ते जनतेला वाचविण्यासाठी स्वत: संक्रमित झाले आणि आम्हाला सोडून गेले. मी त्यांच्या कर्तृत्वाला नमन करतो. त्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची सन्मान निधी दिला जाईल असे जाहीर केले. अमित कुमार यांचा योग्यवेळी उपचार होऊ शकला नाही, असा आरोप त्यांच्या सहकार्यांकडून केला जात आहे. संबंधित रुगण अधिकारी असते तर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले असते, असेही सहकार्‍यांनी नमूद केले आहे.