नेहा-अंगदने खाल्ला घरच्यांचा ओरडा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नेहा धुपिया लग्नाअगोदर प्रेग्नंट असल्याची बातमी ज्यावेळी अंगदच्या  घरच्यांना कळली तेव्हा दोघानाही त्यांच्या पालकांचा जाम ओरडा बसला होता. अंगद बेदी आणि नेहा धुपियाने  घाईघाई मध्ये लग्न केलं तेव्हा चाहत्यांना जरा गरबडच वाटली. नेहाच्या नो फिल्टर या शो मध्ये नुकताच अंगदने याबाबतीत खुलासा केला.

नेहा आणि अंगद लग्नाआधी अंगद नेहाच्या फ्लॅटवर राहत होता. नेहाला ज्यावेळी कळलं कि ती प्रेग्नंट आहे तेव्हा तिने अंगद चे सगळे सामान घराबाहेर टाकले होते. या शो मध्ये अंगद ने हा किस्सा अगदी गंमतीशीरपणे सांगितली. अंगद बेदी या शो मध्ये असंही म्हणाला कि लग्नाआधी त्याने ७५ मुलींना डेट केलाय. आणि त्यात त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलींबरोबर त्याचे जास्त सूत जुळले गेले. तसंच नेहा बरोबरच रिलेशनशिप दुसऱ्या मुलींच्या रिलेशनशिप पेक्षा सगळ्यात जास्त दिवस टिकल्याचंही त्यानं सांगितलं.

नेहाचा नो फिल्टर हा शो बराच प्रसिद्ध आहे. यात बॉलिवूड मधली अनेक मोठी मंडळी येतात आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक गुपित उलगडतात. प्रेग्नन्ट असताना सुद्धा नेहा बरीच ऍक्टिव्ह दिसतीये. या अवस्थेतही तिचा फॅशन सेन्स कमालीचा आहे. नेहा अंगद पेक्षा २ वर्षांनी मोठी आहे. नेहाला मिस इंडिया फेमिनाचा ‘किताब’ देखील मिळालाय. अंगद देखील प्रसिद्ध मॉडेल आणि ऍक्टर आहे.